Ads

Saturday, July 20, 2019

WI दौरा: संघाची निवड आज, धोनीला पर्याय कोण?

नवी दिल्ली: ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज (रविवार) निवड करण्यात येणार आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय वरिष्ठ निवड समितीच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित बैठकीत ही निवड करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा होईल. माजी कर्णधार एमएस धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने मात्र आपण विश्रांती घेणार नसल्याचे म्हटले आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, धोनी विश्रांती घेत असताना यष्टीरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी नेतृत्व कोणाच्या हाती सोपवले जाणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि, ऋषभ पंत वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाईल हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. परंतु, दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी २-३ नावांची चर्चा होऊ शकते. यात संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या नावांचा समावेश आहे. गोलंदाजीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी? विंडीज दौऱ्याच्या वेळी जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे निवड समितीला नव्या चेहऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. नव्या गोलंदाजांच्या यादीत नवदीप सैनीचे नाव प्रमुख आहे. हा वर्ल्डकपमध्ये राखीव खेळाडू होता. खलील अहमद, आवेश खान, दीपक चहर यांना वेस्ट इंडीजचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीतही बदलाची शक्यता नव्या संघात फलंदाज मयंक अग्रवालच्या समावेशाची दाट शक्यता आहे. रोहित शर्माला या वेळी विश्रांती दिली जाईल का, हेही पहावे लागणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी गेलेल्या शुभमन गिल यांचे स्थानही पक्के समजले जात आहे. केदार जाधव आणि दिनेश कार्तिक संघाबाहेर जाणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या दोघांमध्ये विजय शंकरचेही नाव चर्चेत आहे. विजय शंकर वर्ल्डकपमध्ये जायबंदी झाला होता. कोण असेल कसोटी संघात? कसोटी संघाचा विचार करता सर्व प्रमुख खेळाडू कसोटी संघात असतील हे नक्की. ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची मालिका खेळणारा संघच कायम राहण्याची शक्यता आहे. कसोटी संघात एखाददुसरा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलामीचा युवा फलंदाज पृथ्वी जखमी आहे. कसोटी मालिकेपर्यंत तो बरा होईल किंवा कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकेश राहुल आणि मयंक यांना सलामीसाठी पाठवले जाऊ शकते. पृथ्वी संघात नसेल तर नवा फलंदाज शोधणे निवड समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अशात मुरली विजयला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O8yoLl

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...