मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा असतानाच, दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट संबोधित करणार नसल्याचं वृत्त धडकलं. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं बोललं जात होतं. मात्र, विराट कोहलीच पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे, असं स्पष्ट करत बीसीसीआयनं या चर्चेवर पडदा टाकला. विराट आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यात खरोखरच वाद निर्माण झाला आहे का? कोणत्या कारणांमुळं दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली? या प्रश्नांची उत्तरं खुद्द विराट कोहलीच देऊ शकेल, असं वाटत होतं. मात्र, वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट संबोधित करणार नसल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं. पत्रकार परिषदेत रोहितच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यापासून वाचण्यासाठी विराट पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार नाही, असं वृत्त होतं. मात्र, या सर्व चर्चांना बीसीसीआयच्या ई-मेलनं पूर्णविराम दिला. सोमवारी रात्री वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी संध्याकाळी सहा वाजता मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये विराट कोहली पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत 'ही' परंपरा खंडित होणार विदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार संबोधित करत होते. वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. मात्र, सोमवारी ही परंपरा खंडीत होणार आहे. रवी शास्त्रींचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळं आज केवळ विराट पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. दरम्यान, रोहित शर्मासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना विराट पत्रकार परिषदेत उत्तरे देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YbhEb8
No comments:
Post a Comment