मुंबई: वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट निवड समितीनं आज टी-२०, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघांची घोषणा केली. संघ निश्चित झाल्यानं आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष दोन्ही देशांमधील लढतींकडं लागलं आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२०, तीन वन-डे व दोन कसोटी सामने खेळणार आहे. असं असेल वेळापत्रक... > टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात ३ ऑगस्ट रोजी होईल > पहिला आणि दुसरा टी-२० सामना सलग ३ व ४ ऑगस्टला सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड (लॉन्डरहिल, फ्लोरिडा) वर खेळला जाईल. > तिसरा टी-२० सामना ६ ऑगस्ट रोजी प्रोविन्स स्टेडियम (गयाना) मध्ये होईल. > पहिला एकदिवसीय सामना ८ ऑगस्ट रोजी प्रोविन्स स्टेडियमवर होईल. तर, दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना ११ व १४ ऑगस्टला क्वीन्स पार्क ओव्हल (पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) मैदानावर खेळला जाईल. > पहिला कसोटी सामना २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्ट रोजी जमैकातील सबीना पार्कवर होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32InyyQ
No comments:
Post a Comment