जयपूर: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यावेळी राजस्थान संघातील तीन खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर, राहुल चाहर आणि खलील अहमद अशी या तिघांची नावं असून हे तिघंही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. राहुल हा फिरकी गोलंदाज आहे तर दीपक आणि खलील वेगवान गोलंदाज आहेत. ' भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. बराच काळ मला भारतीय संघात खेळण्याची इच्छा आहे. यामुळे याकडे मी एक मोठी संधी म्हणून पाहतो आहे'. अशी माहिती खलील अहमदने दिली आहे. अॅंटीग्वा येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारतीय संघाच्या टीम एमध्ये खलील अहमदला समाविष्ट करण्यात आलं आहे. तर दीपक आणि राहुल भावंडं असून त्यांच्या मोठ्या बहिणीने दोघांचे कौतुक केलं आहे. ' दोन्ही भावंडांची संघात निवड होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.' असं मालती चाहर हिने सांगितलं. दीपकच्या वडिलांची आग्रा येथे क्रिकेट अकॅडेमी आहे. राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30MWY5U
No comments:
Post a Comment