नवी दिल्ली भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्याचे वृत्त आहे. आपण वेस्ट इंडीजला जाणार नसून पुढील दोन महिने रेजिमेंटसोबत घालवणार आहोत असे धोनीने स्वत: सांगितल्याचे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले आहे. धोनीने आपला हा निर्णय बीसीसीआयलाही कळवला आहे. रविवारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2xZAq5S
No comments:
Post a Comment