<strong>नागपूर :</strong> एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या भावाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आरोपी सूरज पाटीलने नियोजनपूर्वक काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोल मेश्रामची हत्या केली. कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूरज पाटीलचे अमोल मेश्रामच्या धाकड्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. सूरज पाटीलने तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी मागणीही घातली होती. परंतु मेश्राम कुटुंबीयांनी ही मागणी नाकारुन तिचा विवाह मे 2018 मध्ये महाराष्ट्राबाहेर लावून दिला. यामुळे सूरज पाटील अतिशय संतप्त झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसात सूरजने नियोजनपूर्वक अमोलसोबत मैत्री वाढवली होती. अखेर गुरुवारी रात्री सूरजने अमोलला दारु पाजली. तो मद्यधुंद अवस्थेत असतानाच सूरजने काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोलचा खून केला. वेलतूर पोलिसांनी आरोपी सूरज पाटीलला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.
from maharashtra https://ift.tt/2PgYQ0Y
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
मुंबई: दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्ष...
No comments:
Post a Comment