<strong>सोलापूर :</strong> कुठे, कधी, कसे तारे तोडावेत, याचं भान राहिलं नाही की काय होतं हे सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातले खासदार शरद बनसोडे यांना हातात माईक मिळाला आणि ते वाट्टेल ते बरळू लागले. इतकं बरळले की त्यांना 'चाबरा खासदार' अशी उपाधीच मिळाली आहे. भर सभेत सभ्यतेची पातळी सोडली, बाया-बापड्यांसमोर गुप्तांगाची गोष्ट सांगितली, सुशीलकुमार शिंदेंसमोर अकलेचे तारे तोडले, यंदाच्या आंबटशौकीन खासदार पुरस्काराचे मानकरी कोण? नाव फक्त एक... शरद बनसोडे... सोलापुरातल्या पनमंगरुळ या त्यांच्या जन्मगावी काल एका डॉक्टरांची एकसष्ठी होती. त्या कार्यक्रमात बनसोडे अनेक पुड्या सोडत होते. पण भाषण रंगात आलं आणि साहेबांचाही तोल सुटला. सायबांनी शाळेत असताना त्यांना झालेल्या गुप्तांगाच्या दुखण्याची कहाणी भरसभेत सांगितली. ते कन्नडमध्ये सांगत होते... मी लहानपणी आठवी-नववीत असताना एकदा झाडावरुन पडलो. त्यामुळे माझे गुप्तांगच सरकले. माझे वडील मला दवाखान्यात घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मला चड्डी काढण्यास सांगितलं. मग काय, माझी पंचाईतच झाली. मी वडिलांकडे बघितलं तर ते डॉक्टरांना 'बघून घ्या' असं सांगत तिथून निघून गेले. डॉक्टरांनी एका बाजूला पकडून जोरात हिसका मारला आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर त्रास कमी झाला. तेव्हापासून औषध नाही की काही नाही. बनसोडे असे सुटले होते, की त्यांना आवरणं अवघड झालं होतं. अखेर प्रेक्षकांमधूनच आरडाओरड सुरु झाली. खासदार महाशय जरा गांगरले. पण त्यानंतरही बनसोडेंनी कडी केली. गुप्तांगाची कहाणी कन्नडमधून कळली नसेल, तर मराठीतनं सांगू का? असा आर्ची स्टाईल डायलॉग मारला. अखेर आयोजकांनीही खासदार महोदयांना आवरतं घ्यायला लावलं आणि बनसोडेंनी माईक सोडला. बनसोडेंचा हा पहिला किस्सा नाही. भाषणबाजीत मोकळेढाकळे असलेले बनसोडे याआधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात अडकले आहेत. पण आता मात्र बनसोडेंनी आपल्याच कमरेखालच्या अश्लाघ्य विनोदाने हद्द केली. त्यामुळे बनसोडेसाहेब, जरा बोलताना स्वतःला आवरा!
from maharashtra https://ift.tt/2wqpde4
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
मुंबई: दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्ष...
No comments:
Post a Comment