Ads

Friday, August 31, 2018

बदली नाही तर घटस्फोटाला मदत करा, शिक्षक दाम्पत्य आक्रमक

<strong>मुंबई/नांदेड :</strong> वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शाळांमध्ये बदली झाल्यामुळे तब्बल 275 शिक्षक दाम्पत्यांनी जवळपासच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. बदली देणार नसाल, तर घटस्फोट घेण्यासाठी मदत करा अशी टोकाची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. शबनम शेख हदगाव तालुक्यातील मार्लेगावच्या प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका म्हणून काम करतात. पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवतात, तर पती बंदेनवाज लातूर जिल्ह्यात शिक्षक आहेत. शबनम यांनी 2008 मध्ये एकाच जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून अर्ज केला. त्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. शबनम आणि बंदेनवाज यांना एका मुलगा आणि एक मुलगी आहे. शबनम मुलीसह नांदेडमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. मुलाला वसतिगृहात पाठवलं आहे. पती लातूर जिल्ह्यात. कुटुंब फक्त नावालाच उरलं आहे. राज्यभरात अशी अनेक शिक्षक दाम्पत्यं आहेत, ज्यांच्या कुटुंबाची अशी वाताहात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी 250 शिक्षक पती पत्नींनी तृप्ती देसाईंच्या नेतृत्वात पंकजा मुंडेंची भेट घेतली. बदली देणार नसाल, तर घटस्फोट घेण्यासाठी मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात विनंती बदल्यांसाठी तब्बल 275 शिक्षक प्रतीक्षेत आहेत. यावरुन राज्याची अवस्था काय असेल याचा अंदाज येतो. वर्षानुवर्ष फक्त करिअरसाठी दूर राहून मनस्वास्थ्य, कुटुंब कसं टिकेल? मुलांची शिक्षणं, त्यांचं आयुष्य समृद्ध कसं होईल? असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. पण यंत्रणेतल्या कागदपत्रांना, लालफितीला किंवा सरकारी बाबूंना असे भावनात्मक प्रश्न पडत असतील यावर विश्वास बसत नाही.

from maharashtra https://ift.tt/2MZ1Odl

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...