<strong>कोल्हापूर :</strong> नगराध्यक्षांनी दिलेल्या शिक्षेमुळे एका शिपायाला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार कोल्हापुरातील आजरा नगरपंचायतीमध्ये घडला आहे. सुरेश जाधव असं शिपायाचं नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजरा नगरपंचायतीत शुक्रवारी (30 ऑगस्ट) ही घटना घडली. भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी शिपायांना नाश्त्याची सोय करण्यास सांगितलं होतं. परंतु नाश्ता देण्यास उशीर झाल्याने शिक्षा म्हणून नगराध्यक्षांनी सुरेश जाधव यांच्यासह आणखी एका शिपायाला हात जोडून उभं राहण्याची शिक्षा दिली. मात्र शिक्षेमुळे अपमान झाल्याची भावना सुरेश जाधव यांच्या मनात आला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यानंतर नगरपंचायतीमधील इतर कर्मचाऱ्यांनी सुरेश जाधवांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. दुसरीकडे, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी केला आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचल्याचा दावा त्यांनी केला आहे.
from maharashtra https://ift.tt/2PmTAJf
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
The White House said on Wednesday it was encouraged by a US judge's decision not to dismiss the Federal Trade Commission's antitrust...
-
Home minister Amit Shah met several families who were "affected" by the alleged exodus from Kairana some years ago during a door-t...
No comments:
Post a Comment