Ads

Thursday, August 30, 2018

..तेव्हा दरवाजा उघडा, कुटुंबाला संपवत तरुणाची आत्महत्या

<strong>औरंगाबाद:</strong> पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादेत घडली.  कृष्णा तात्याराव देवरे असं कुटुंब संपवून गळफास घेणाऱ्याचे नाव आहे. 30 वर्षीय कृष्णा देवरेने 4 आणि 6 वर्षाच्या मुलींना गळफास लावून ठार केलं. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात कुदळ मारुन हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेतला. फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी इथं ही थरारक घटना घडली. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. <strong>मृतांची नावे</strong> सर्वदा कृष्णा देवरे (६) हिंदवी कृष्णा देवरे (४) शिवकन्या कृष्णा देवरे (२७) कृष्णा तायेराव देवरे (३०) <strong>आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी</strong> दरम्यान, कृष्णा देवरेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत 'पोलिसांना फोन लावा, तेव्हा दरवाजा उघडा, राम राम राम राम ' असं म्हटलं आहे. या चिठ्ठीतील मजकुराचा अर्थ काय आणि कृष्णाने स्वत:सह कुटुंबाला का संपवलं, असा सवाल उपस्थित होत आहे. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/08/31104051/Aurangabad-Suicide-1.jpg"><img class="alignnone size-full wp-image-580434" src="https://ift.tt/2PSy2oT" alt="" width="1280" height="723" /></a>

from maharashtra https://ift.tt/2N6finx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...