<strong>सांगली :</strong> महापालिकेत सत्तेत असूनही लाज वाटेल असं काम शहरात झालंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेला आश्वासननामा नसून तो झूठनामा आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन समोर झालेल्या सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, नितीन बानगुडे पाटील आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानादिवशी मतदान करताना लक्ष ठेवा, मशीनचे क्रमांक लक्षात ठेवा, शिवसेनेला मतदान होतेय का हे पाहा असा सल्ला देखील मतदारांना दिला. सांगली महापालिकेसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
from maharashtra https://ift.tt/2NSTybm
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment