मुंबई : आयपीएल हे नेहमीच युवा खेळाडूंसाठी क्रिकेट पटलावर झळकण्याचं प्रमुख व्यासपीठ राहिलं आहे. दरवर्षी अनेक खेळाडू आपले नशीब आजमावण्यासाठी लिलावात भाग घेतात. मध्येही ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये अनकॅप्ड खेळाडूंची संख्या मोठी आहे. या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक आहे तो म्हणजे त्रिपुराचा १९ वर्षीय लेगस्पिनर . अमितची मेगा लिलावासाठी निवड झाली आहे. अमित अली हा मूळचा त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यातील कमलासागर गावचा. भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण (फेन्सिंग) घातल्यानंतर खेळाडूचे घर आणि गावाचा काही भाग भारतापासून वेगळा झाला. त्यामुळे भारतीय नागरिक असलेल्या अलीला त्याच्या क्रिकेट कोचिंगसाठी तारेवरची कसरत करावी लागते. क्रिकेट शिकण्यासाठी त्याला दररोज एका देशाची सीमा ओलांडून यावे लागत असे. तरीही अलीने चिकाटी सोडली नाही. वयाच्या १९ व्या वर्षी आयपीएल लिलावात स्थान मिळवले. लहान शहर आणि खेड्यांमधून येणाऱ्या इतर खेळाडूंसाठीही ही प्रेरणादायी गोष्ट आहे. त्रिपुराचा लेगस्पिनर असलेला अमित अनेक युवा खेळाडूंप्रमाणे लिलावासाठी खूप उत्सुक आहे. आयपीएल लीग खेळणे हे प्रत्येक युवा खेळाडूचे स्वप्न असते. जगातील सर्व लीगमध्ये आयपीएलला सर्वाधिक पसंत केले जाते. “क्रिकेटपटू म्हणून त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू तर आणलेच, पण अनेकांना प्रोत्साहनही दिले आहे. गेल्या वर्षी लिस्ट-ए सामन्यातून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्रिपुराकडून मैदानात उतरला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी लेगस्पिनर अमित अलीने २०२१ मध्ये लिस्ट ए मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले. तो त्रिपुरासाठी विजय हजारे ट्रॉफी आणि नंतर सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये खेळला. अमित आतापर्यंत ७ लिस्ट-ए सामने खेळला आहे. यामध्ये त्याने २१.२५ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकदा ४, तर एकदा ५ बळीही घेतले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/gXjscS6
No comments:
Post a Comment