नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी एक वाईट बातमी आहे. मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार कायरन पोलार्डला आता यंदाच्या आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...मुंबई इंडियन्सने पोलार्डला संघात कायम ठेवण्यासाठी सहा कोटी रुपये मोजले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंसाठी आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच पोलार्डला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. पण आता पोलार्ड आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे दिसत आहे. कारण बीसीसीआयने परदेशी खेळाडूंसाठी पाच दिवसांचा क्वारंटाइनचा अवधी ठेवला आहे. या पाच दिवसांनंतर खेळाडूंची चाचणी होणार आहे आणि त्यांची चाचणी जर निगेटीव्ह आली तरच त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येणार आहे. आयपीएलपूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका २८ सप्टेंबरला संपणार आहे आणि आयपीएलची सुरुवात २७ मार्चला होणार आहे. त्यामुळे २८ मार्चला कसोटी सामान संपल्यावर पोलार्डला भारतात यावे लागेल. त्यानंतर त्याला पाच दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर जर पोलार्डची करोना चाचणी निगेटीव्ह आली तरच तो मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पहिल्या काही सामन्यांना त्यांचा उपकर्णधार पोलार्ड मुकणार असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित नसताना संघाचे नेतृत्व मुंबई इंडियन्सने बऱ्याचदा पोलार्डकडे सोपवले होते. त्यामुळे जर रोहित आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकला नाही तर उपकर्णधारपद कोणाकडे द्यायचे, हा मोठा निर्णय मुंबई इंडियन्सला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पोलार्डने संघाचे कर्णधारपद भूषवले होते. पण दुसऱ्या सामन्यापूर्वी पोलार्डला दुखापत झाली, त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खेळता आले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या वनडेमध्ये निकोलन पुरनकडे वेस्ट इंडिजच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/TeQ8hvx
No comments:
Post a Comment