मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत. शनिवारी आणि रविवारी (१२ आणि १३ फेब्रुवारी) साठी मेगा लिलाव पार पडणार आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि जबरदस्त संघ म्हणून () ओळखला जातो. या संघाच्या यशासाठी महेंद्रसिंह धोनीचे सुपीक डोके कारणीभूत आहे. संघ बांधणी असो वा लिलावात खेळाडू घेणे असो, धोनीचा सल्ला सर्वत्र दिसून येतो. यावेळीही मेगा लिलावाच्या तयारीसाठी त्याने काही दिवस चेन्नईत मुक्काम ठोकला होता. या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने आयपीएल लिलावाबाबत धोनीच्या मानसिकतेवर प्रतिक्रिया दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो (ESPNcricinfo) शी एका व्हिडिओ चॅटमध्ये बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, 'धोनीला नवीन खेळाडू नको आहेत. त्याच्यासाठी अनुभवी खेळाडू जास्त महत्वाचे आहेत. तसेच त्याला महागडे खेळाडू देखील नको आहेत. त्याच्याकडे आधीच काही अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यानंतर त्याला एक किंवा दोन गोलंदाज पाहिजे आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी करतील, अशा प्रकारचे इतर खेळाडू हवे आहेत. जास्त बोली लावून खेळाडू विकत घेण्यावर त्याचा विश्वास नाही. अनुभवी खेळाडूकडून कशी कामगिरी करून घ्यायची, हे त्याला चांगले माहीत आहे.' इतर संघांबाबत बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, गोलंदाजीत चुका करतात राजस्थान रॉयल्स. पैसे खर्च करूनही ते त्यांच्यासोबत मोठ्या नावांचा समावेश करत नाहीत. जशा प्रकारे पैसे खर्च करता, तशा प्रकारच्या खेळाडूंना संघात सामावून घेतले पाहिजे. जास्त पैसे खर्च करूनही ते जयदेव उनाडकट सारख्या खेळाडूंना विकत घेतात. उनाडकट हा वाईट गोलंदाज नाही, पण तरीही परदेशी खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोफ्रा आर्चर हे राजस्थान रॉयल्समध्ये मोठे नाव आहे, पण तो या मोसमात खेळू शकणार नाही. इंग्लंडचा बेन स्टोक्सही यंदा खेळणार नाही. गोलंदाजीच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सला नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे. लिलावात रॉयल्सची बोली पाहण्यासारखी असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/PWAZfwu
No comments:
Post a Comment