अहमदाबाद : भारतीय संघातील शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना करोना झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. भारतीय संघात आता करोनाचा शिरकाव झाला आहे. पण त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका रद्द होणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना ६ फेब्रुवारीला सुरु होणार आहे, त्यामुळे आता फक्त चार दिवसांवर पहिला सामना येऊन ठेपला आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेचे भवितव्य बीसीसीआयच्या हातामध्ये असेल. बीसीसीआयचे अधिकारी यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि अन्य खेळाडूंबरोबर चर्चा करतील. जर संघामध्ये या करोनाच्या प्रवेशामुळे भितीचे वातावरण असेल तर ही वनडे मालिका रद्द केली जाऊ शकते. इंग्लंडमधील कसोटी मालिकेच्यावेळी देखील असेल घडले होते. चौथ्या कसोटीनंतर भारतीय संघात करोनाचा प्रसार झाला होता आणि त्यानंतर भारतीय खेळाडू घाबरले होते. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंची चर्चा करून पाचवा कसोटी सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण जर खेळाडूंना भिती वाटत नसेल तर बीसीसीआय ही मालिका खेळवण्याचा निर्णय घेईल. सध्याच्या घडीला तरी भारतीय संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे आणि त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या तिघांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तातडीने पुन्हा करोना चाचणी करण्यात येऊ शकते आणि ते जर पॉझिटीव्ह नसतील तरच त्यांना संघात प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे या तिघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे करोना अहवाल केस येतात, हा पाहिल्यावर बीसीसीआय पुढचा निर्णय घेऊ शकते. कारण या तिघांच्या संपर्कात काही खेळाडू आले असतील आणि ते जर करोना पॉझिटीव्ह सापडले तरी तो भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन बीसीसीआय निर्णय घेईल. पण सध्याच्या घडीला तरी वनडे मालिका रद्द करण्याचा विचार बीसीसीआय करू शकणार नाही, असे दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/bWN2mR0iu
No comments:
Post a Comment