अहमदाबाद : भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये जोरदार वाद असल्याचे चाहत्यांना पुन्हा एकदा वाटत आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा रोहित आणि विराट आमने-सामने आले होते. पण विराट आणि रोहित यांच्यामध्ये मैदानात वाद झाला का, याबाबत सुनील गावस्कर यांनी खरी गोष्ट यावेळी सांगितली आहे. सुनील गावस्कर यांनी नेमकं काय सांगितलं, पाहा...विराट आणि रोहित यांच्यातील वादाबाबत गावस्कर यांनी सांगितले की, " भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराटने जे काही केलं ते खेळभावनेमुळेच केलं. विराट आणि रोहित यांच्यामध्ये मोठा वाद असल्याचे म्हटले जाते, पण माझ्यामते या सर्व निरर्थक गोष्टी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विराट आणि रोहित यांच्यामध्ये वाद असल्याचे म्हटले जात आहे. पण या गोष्टीचा कोणताही फरक विराट आणि रोहितवर पडणार नाही, कारण या दोघांनाही सत्य नेमकं काय आहे, हे माहिती आहे. भारतीय संघात असा कोणताही खेळाडू नसेल की जो संघाच्या हिताचा विचार करत नसेल. जर एखाद्या खेळाडूने धावा केल्या नाहीत किंवा विकेट्स मिळवल्या नाहीत तर त्याला संघाबाहेर काढण्यात येऊ शकते आणि हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यामध्ये वाद असल्याच्या फक्त अफवाच आहेत." नेमकं घडलं तरी काय होतं, पाहा...या सामन्यात एक क्षण असा आला की, डीआरएस घ्यायचा की नाही हा निर्णय रोहित शर्माला घेता येत नव्हता. युजवेंद्र चहलचा एक चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून रिषभ पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये दाखल झाला होता, पण मैदानातील पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले होते. त्यामुळे डीआरएस घ्यायचा की याबाबत रोहितच्या मनात संभ्रम होता. रिषभ पंतलाही डीआरएस घ्यायचा की नाही, हे कळत नव्हते. त्यावेळी विराट तिथे आला आणि त्याने फलंदाजाची बॅट चेंडूला लागली आहे. त्यामुळे डीआरएस घ्यायला हवा, असे रोहितला सांगितले. त्यानंतर विराट आणि रोहित यांच्यामध्ये मोठा वाद असल्याचे चाहत्यांनी म्हटले होते. पण यावर गावस्कर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/0oJGspS
No comments:
Post a Comment