बंगळुरु : लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने इशान किशनला सर्वात जास्त किंमत मोजत आपल्या संघात घेतला. पण आता लिलावाच्या दुसऱ्या दिवसासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठा गेम प्लॅन आखला आहे. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी खास सहा खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर असणार आहे. पहिला खेळाडू...दुसऱ्या दिवशी युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाला संघात घेण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक असेल. कारण चेतनने आतापर्यंत आयपीएलमध्ये धडाकेबाज गोलंदाजी केली. फार कमी वयात चेतनने अचूक आणि भेदक मारा करत भल्या भल्या फलंदाजांना नाचवले आहे. त्याचबरोबर भविष्याचा विचार करता मुंबई इंडियन्सचा संघ चेतनवर बोली लावण्यासाठी सज्ज असेल. दुसरा खेळाडू...मार्को जेन्सन हा मुंबई इंडियन्सच्या रडारवरचा दुसरा खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या युवा खेळाडूने फार कमी दिवसांमध्ये आपील दखल घ्यायला लावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मार्कोने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मार्कोला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक असेल. तिसरा खेळाडू...न्यूझीलंडच्या जेम्स नीशामने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर फार चांगली कामगिरी केली आहे. पण त्याला हवी तशी प्रसिद्धी मात्र मिळालेली नाही. नीशाम हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने बऱ्याचदा आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे त्याला संघात घेत हार्दिक पंड्याची कमी मुंबईचा संघ भरून काढू शकतो. जर जेम्सला संघात घेता आले नाही तर मुंबईची नजर कॉलिन डी ग्रँडहोम किंवा कार्लोस ब्रेथवेटवर असू शकते. चौथा खेळाडू...मुंबई इंडियन्समध्ये यापूर्वी असलेल्या अॅडम मिल्नेवर यावेळी संघाची नक्कीच दुसऱ्या दिवशी नक्कीच नजर असेल. कारण मुंबईकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर मिल्ने हा कसा खेळाडू आहे, हे मुंबईच्या संघाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे मिल्नेला संघात स्थान देण्याकडे मुंबईचे लक्ष असेल. पाचवा खेळाडू...आंतरराष्ट्रीय स्तरावर लायम लिव्हिंदस्टोनने आपली दखल घ्यायला लावली आहे. जर मुंबईच्या संघाला एका धडाकेबाज खेळाडूची गरज असेल तर ते नक्कीच लायमवर नजर ठेवून असतील. लायम जर संघात आला तर मुंबई इंडियन्सची बरीच कामं हलकी होऊ शकतात. सहावा खेळाडू...न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर यावेळी मुंबई इंडियन्सच्या रडारवर नक्कीच असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून लायमने आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचबरोबर भारतातील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक असतात आणि त्यासाठी सँटनर हा एक महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सँटनरवर मुंबईचा संघ लक्ष ठेवून असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/VEDxjTL
No comments:
Post a Comment