Ads

Friday, April 3, 2020

शिखर धवन झाला जितेंद्र; पत्नीसोबत केला डान्स!

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. भारतीय क्रिकेटपटू कुटुंबासोबत घरी वेळ घालवत आहेत. अनेक जण सोशल मीडियावरून काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. पण त्याच बरोबर मोकळ्या वेळेत काही गंमतीशीर व्हिडिओ देखील शेअर करत आहे. भारताच्या एका क्रिकेटपटूने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो पत्नीसोबत एका हिंदी चित्रपटाच्या डान्स करताना दिसत आहे. वाचा- भारतीय संघातील सलामीवीर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. कुटुंबासोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तो शेअर करतो. लॉकडाऊनंतर घरी पत्नीच्या आदेशावरून घरातील काम करतानाचा एक धम्माल व्हिडिओ शिखरने काही दिवासांपूर्वी शेअर केला होता. आता शिखरने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो अभिनेता जितेंद्रच्या भूमिकेत गेला आहे. वाचा- शिखरने पत्नी आयशा सोबत 'ढल गया दिन, हो गई शाम' या गाण्यावर डान्स केला. व्हिडिओत सचिनने जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले आहेत आणि आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा लुक केला आहे. हमजोली चित्रपटातील या गाण्यात जितेंद्र आणि लीना यांनी बॅडमिंटन खेळत अभिनय केला होता. तर शिखर आणि आयशाने टेबल टेनिस खेळत अभिनय केला आहे. सोशल मीडियावर शिखरच्या या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. याआधी शिखरने घरात पडे धुवत आणि वॉशरूम साफ करताना असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत शिखरची पत्नी आयशा त्याला काम करण्याचे ऑर्डर देत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हिंदी चित्रपटातील 'जब से हूई है शादी...' हे गाणं जोडले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JzCreP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...