Ads

Wednesday, April 29, 2020

रोहितला धोनीने दुसरी संधी दिली नाही तर...

मुंबई: जगातील सर्वात धोकादायक सलामीवीर रोहित शर्माचा आज ३३वा वाढदिवस आहे. क्रिकेटमधील हिटमॅन ही ओळख तयार होण्यासाठी रोहितने प्रचंड संघर्ष केला आणि त्याला साध मिळाली ती भारताच्या एका कर्णधाराची... भारतीय संघात २००७ मध्ये स्थान मिळाल्यानंतर मधळ्या फळीत खेळत होता. पण भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रोहितची सलामीवीर म्हणून क्षमता ओळखली आणि त्याला संधी दिली. धोनीच्या या एका निर्णयामुळे रोहितचे करिअरच बदलले आणि तो स्टार झाला. वाचा- भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याआधी रोहित क्रमांक तीन ते सात या दरम्यान फलंदाजी केली होती. पण तो फार यशस्वी झाला नव्हता. त्यामुळेच धोनीने रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. वाचा- धोनीने रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे २०११ साली सलामीवीर म्हणून संधी दिली. तेव्हा रोहितने मालिकेत २३,१ आणि ५ अशा धावा केल्या. त्यानंतर रोहितला पुन्हा पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. दोन वर्ष खालच्या क्रमांकावर खेळल्यानंतर धोनीने रोहितला पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून संधी देण्याचे ठरवले. या दुसऱ्या संधीचा मात्र रोहितने फायदा घेतला आणि अनेक ऐतिहासिक खेळी केल्या. वाचा- २०१३ साली धोनीने इंग्लंडविरुद्ध रोहितला सलामीवीर म्हणून पाठवले. रोहितने पहिल्याच सामन्यात ८३ धावा केल्या. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने दोन अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ ही द्विशतकी खेळी केली. रोहितची बॅट चालली आणि तो भारतीय संघाचा नियमीत सलामीवीर झाला. वाचा- रोहितने सलामीवीर म्हणून १२८ सामने खेळले आहेत. पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ५ हजार ५२७ धावा केल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर १ हजार ६२१ धावा. रोहितने सलामीवीर म्हणून आतापर्यंत ३ द्विशतक आणि २७ शतक केली आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cYSrmZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...