मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते यांच्या निधनावर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला. ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात निधन झाल्याचे त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी सांगितले. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनावर मास्टर ब्लास्टर , भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी शोक व्यक्त केला. सचिन तेंडुलकर- ऋषीजी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांचे चित्रपट पाहून मोठा झालो. ते जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा खुप आनंद वाटत असे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. नितूजी, रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंबियांच्या दुखात मी सहभागी आहे. विराट कोहली- ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त मनाला न पटणारी आणि अविश्वसनिय वाटते. काल इरफान खान तर आज ऋषी कपूर जी. आपल्यातील दिग्गज सोडून जात आहेत हे पटत नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. मी कपूर कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे. विरेंद्र सेहवाग- मोहम्मद कैफ- सायना नेहवाल- व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f5r24Q
No comments:
Post a Comment