लाहोर: मॅच फिक्सिंग हा प्रकार क्रिकेटसाठी नवा नाही. गेल्या काही वर्षात अनेक खेळाडूंना यासाठी शिक्षा झाली आहे. अशाच एका मॅच फिक्सिंग प्रकरणी शिक्षा झालेल्या कर्णधाराने १९ वर्षानंतर देशाची माफी मागितली. तसेच मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीला संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. वाचा- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने एका व्हिडिओ मेसेजद्वारे पाकिस्तान बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांना मॅच फिक्सिंग प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी केली आहे. सलीम मलिकवर २००० मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. २००८ मध्ये पाकिस्तानमधील एका सत्र न्यायालयाने मलिकवरील बंदी हटवली होती. पण पाकिस्तान बोर्डाने त्याच्यावरील बंदी अद्याप हटवली नाही. वाचा- यासंदर्भात मलिकने सांगितले की, १९ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल मी देशाची माफी मागतो. आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे. वाचा- मला क्रिकेट खेळण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. वयाच्या आठव्या वर्षी मी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. क्रिकेटमुळेच मी जगू शकतो. मी पुन्हा क्रिकेटमध्ये परत येण्यास उत्सुक आहे. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अन्य खेळाडूंना संधी देऊ शकते तर मला देखील मिळाली पाहिजे. मानवतेचा विचार करून मला क्रिकेटमध्ये परतण्याची दुसरी संधी द्यावी, असे मलिकने एका व्हिडित म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने सलीम मलिकसाठी आवाज उठवला होता. ज्या पद्धतीने भारतात माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनवरील बंदी हटवण्यात आली आणि त्याला पुन्हा संधी देण्यात आली. त्याच पद्धतीने मलिका याला क्रिकेट संदर्भात कार्यत संधी दिली पाहिजे. मलिकचे करिअर अशा पद्धतीने संपणे निराश करणारे आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शेन वॉर्न, मार्क वॉ यांनी १९९५ मध्ये मलिकवर आरोप केला होता की त्याने पाकिस्तान दौऱ्यात लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मलिकने पाकिस्तानकडून १०३ कसोटीत १५ शतकांसह ५ हजार ७६८ धावा केल्या आहेत. तर वनडेत २८३ सामन्यात ५ शतके आणि ४७ अर्धशतक केली आहेत. मलिकने ३४ वनडे आणि १२ कसोटीत पाक संघाचे नेतृत्व केले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VDtwj7
No comments:
Post a Comment