सध्यच्या घडीला देशात करोना व्हायरस पसरलेला आहे. त्यामुळे देशभरात ३मेपर्यंत लॉकडाऊन आहे. या परिस्थितीत भारताचा माजी कमहान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने चाहत्यांना एक खास गोष्ट सांगितलेली आहे. करोना व्हायरसचे हे युद्ध आपल्या सर्वांना जिंकायचे आहे. त्यामुळे आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आता करोना व्हायरसला पळवण्यासाठी सचिनने एक खास गोष्ट सांगितली आहे. सचिनने ही खास गोष्ट सांगितली तर आपण सर्व मिळून करोना व्हायरसला पळवू शकतो. सचिनने याबाबत एक खास ट्विट केले आहे. सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, " तुम्हा ज्या मला शानदार शुभेछा दिल्यात त्याटबद्दल धन्यवाद. पण सध्याच्या घडीला तुम्ही क्रीझमध्ये राहा आणि आऊट होऊ नका, ही माझी प्रार्थना आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आपण सर्वां घरात राहा आणि सुरक्षित राहा." देशात करोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे निर्णय घेतला आहे. दर वर्षी सचिनचा वाढदिवस ( Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याच्या वाढदिवसाला क्रिकेटसह अन्य क्षेत्रातील दिग्गज लोक उपस्थित असतात. पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळेच सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते. त्यामुळे यावेळी सचिनने आपला वाढदिवस घरातच साजरा केला. सचिन क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी देखील जेथे असायचा तेथे त्याचा वाढदिवस साजरा केला जात असे. पण यावेळी लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश घरीच थांबला आहे. सचिन कुटुंबियांसोबत घरी आहे. गेल्या काही दिवसात सचिनने करोना व्हायरस संदर्भात अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सचिन सातत्याने लोकांना सोशल डिस्टेसिंग ठेवण्यास सांगत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने केलेल्या मार्स्क फोर्सच्या व्हिडिओत सचिन दिसला होता. करोना विरुद्धच्या लढाईत सचिनने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. यातील २५ लाख केंद्र तर २५ लाख राज्य सरकारला दिले होते. त्याशिवाय काही हजार गरीब लोकांच्या एका महिन्याचा खर्च सचिनने दिला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KCoI7r
No comments:
Post a Comment