नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंचे कारनामे अनेकदा चर्चेत येतात. दोनच दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याच्यावर ३ वर्षाची बंदी घातली. गेल्या काही महिन्यांपासून अकलमची पीसीबीच्या समितीकडून चौकशी सुरू होती. मॅच फिक्सिंग सारख्या प्रकरणात शिक्षा होण्याची पाक क्रिकेटपटूची ही पहिली वेळ नाही. अकमलला शिक्षा झाल्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा-वा संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत जेवण पॅक करणारी महिला अन्य कोणी नसून तर उमर अकमलची पत्नी आहे. हा व्हिडिओ २०१९मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील एका सामन्यात पाकचा दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिरची मुलगी आणि उमर अकमलची पत्नीने जेवणाची चोरी केली होती. वाचा- हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युझरने लिहले आहे की, नूर अम्ना जी महान खेळाडू यांची मुलगी तर उमर अकमलची पत्नी आहे. कराची नॅशनल स्टेडियममध्ये जेवण चोरी करताना कॅमेरॅत कैद झाली. वाचा- वॉर्नची धुलाई केली व्हिडिओत एक महिला पॉलिथिनच्या बॅगमध्ये एक-एक पदार्थ पॅक करत असल्याचे दिसत आहे. आता या जुन्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर लोक अकमलला सुनावत आहेत. अर्थात संबंधित महिला ही उमर अकमलची पत्नी आहे याला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. पण त्याआधीच सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा सुरू झाली. वाचा- वाचा- दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तान बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम २.४.४ नुसार पाकिस्तान टी-२० लीग मध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी अकमलवर कारवाई केली. अकमलने पाकिस्तानकडून १६ कसोटी, १२१ वनडे आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १ हजार ३, वनडेत ३ हजार १९४ आणि आणि टी-२०त १ हजार ६९० धावांची नोंद आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VMRo48
No comments:
Post a Comment