Ads

Sunday, April 5, 2020

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावस्करांकडून खिल्ली

जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केले होते. या वक्तव्याचा खरपूस समाचार भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी घेतला आहे. गावस्कर यांनी आपल्या स्तंभलेखातून मल्होत्रा यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. 'मिड डे'मधील स्तंभलेखात गावस्कर म्हणाले की, " जर खेळाडू खेळलाच नाही तर त्याचे मानधन मिळत नाही. जगभरात सर्वच खेळांच्या स्पर्धांमध्ये असेच पाहायला मिळते. पण भारतीय क्रिकेटर्स संघटनेच्या अध्यक्षांनी खेळाडूंचा पगार कापण्याचे केलेले वक्तव्य हे मला मनोरंजक वाटत आहे." ते आपल्या स्तंभात पुढे म्हणाले आहेत की, " मल्होत्रा यांनी केलेले वक्तव्य खेळाडूंच्या बाजूचे वाटत नाही. पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू या संघटनेचा भाग नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणाच्यावतीने हे वक्तव्य केले आहे." करोना व्हायरसचा धक्का क्रीडा जगताला बसला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी आयपीएल सध्या पुढे ढकलली गेली आहे. पण जर आयपीएल रद्द करण्यात आली तर खेळाडूंना ठरवलेले मानधन मिळणार नाही, असे समजते आहे. कसे मिळते खेळाडूंना मानधनआयपीएलमुळे खेळाडू करोडपती झाले. कारण त्यांच्यावर करोडोंची बोली लावून त्यांना संघ मालकांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण या खेळाडूंना त्यांचे पैसे एकरकमी मिळत नाहीत. आयपीएल सुरु होण्याच्या आठवड्याभरापूर्वी त्यांना बोली लागलेल्या रक्कमेच्या १५ टक्के एवढी रक्कम दिली जाते. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना ६५ टक्के एवढी रक्कम दिली जाते तर आयपीएल संपल्यावर खेळाडूंना उर्वरीत रक्कम दिली जाते. खेळाडूचे कसे होणार नुकसानभारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल होणार की नाही, याबाबत काहीच सांगू शकत नाही. पण आयपीएल जर रद्द झाली तर त्याचा फटका संघ मालकांना बसणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय आणि प्रसारण करणाऱ्या कंपनीलाही मोठा फटका बसणार आहे. जर आयपीएल झाली नाही तर खेळाडूंनाही त्यांचे पूर्ण मानधन मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. यावेळी खेळाडूंच्या मानधनात कपातही केली जाऊ शकते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UHDM9y

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...