रांची: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारतानं एक डाव आणि तब्बल २०२ धावांनी जिंकला आहे. आफ्रिकेविरुद्धचा हा भारताचा सलग तिसरा कसोटी विजय असून या विजयासह भारतानं ही मालिका ३-० अशा फरकानं खिशात घातली आहे. चौथ्या दिवशी ८ बाद १३२ धावांवरून डाव पुढं सुरू करणाऱ्या आफ्रिकेचा डाव भारतानं आज अवघ्या ९ मिनिटांत गुंडाळला आणि निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेवर भारतानं मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा मालिका विजय आहे.
तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा सरस खेळ केला. तिन्ही सामन्यात भारताची ही कामगिरी कायम राहिली. परिणामी आज तिसरा सामना जिंकून भारतानं आफ्रिकेला 'व्हाइट वॉश' दिला. पहिल्या डावात रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर ४९७ धावांचा डोंगर उभारणाऱ्या भारतानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांवरच रोखले आणि फॉलोऑन दिला. वाचा: दुसऱ्या डावातही आफ्रिकी फलंदाज फारशी करामत करू शकले नाहीत. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. आफ्रिकेचा एकही फलंदाज ३० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. क्विंटन डी कॉक अवघ्या पाच धावांवर बाद झाला. त्याला उमेश यादवनं बाद केलं. तर डीन एल्गार जायबंदी झाला. त्यानंतर पाहुण्या संघाचा डाव गडगडला. तिसऱ्या दिवसअखेर त्यांच्या ८ बाद १३२ धावा होत्या. भारताला विजयासाठी फक्त दोन विकेटची गरज होती. भारताचा नवोदित गोलंदाज शाहबाज नदीमनं दुसऱ्याच षटकात आफ्रिकेच्या तळाच्या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कालच्या धावसंख्येत आफ्रिकेला फक्त एका रनची भर घालता आली. भारताकडून मोहम्मद शमी यानं तीन गडी बाद केले. उमेश यादव व शाहबाज नदीमनं प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडले. तर, जडेजा आणि अश्विननं प्रत्येकी एक बळी घेतला. वाचा: रोहित शर्मा सामनावीर या सामन्यात द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. रोहितनं भारताच्या पहिल्या डावात २५५ चेंडूत २१२ धावा कुटल्या. त्यात २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P6bgvR
No comments:
Post a Comment