Ads

Sunday, October 27, 2019

कोलकात्यातून होणार टीम इंडियाची गुलाबी सुरुवात

मुंबई: ऐतिहासिक ईडन गार्डनवर आतापर्यंत दोन विश्वचषक स्पर्धेचे अंतीम सामने (सन १९८७ आणि टी-२०: २०१६) खेळले गेले आहेत. या व्यतिरिक्त अनेक संस्मरणीय किसोटी लढतीचे देखील हे मैदान साक्षीदार आहे. कोलकात्यातील हे मैदान दोन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे घरचे मैदान आहे. या मैदानाच्या इतिहासात लवकरच आणखी एक सोनेरी पान जोडले जाणार आहे. इथे टीम इंडियाची पहिली डे-नाईट कसोटी सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामम मंडळाने (बीसीसीआय) बांग्लादेश क्रिकेट मंडळाला (सीबीबी) २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ई़डनवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामना डे-नाईट प्रकारात खेळवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे बीसीसीआयमधील एका सूत्राने माहिती देताना सांगितले. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार बीसीबीने अजून यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआयने डे-नाईट कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती बीसीबीचे ऑपरेशन चेअरमन अक्रम खान यांनीही रविवारी ढाता येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावर आम्ही विचार करून योग्य तो निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. आम्हाला दोन-तीन दिवसांपूर्वीच पत्र मिळाले असून यावर आम्ही नक्कीच एखादा निर्णय घेऊ, मात्र आम्ही यावर अजून कोणतीही चर्चा केलेली नाही, असेही ते पुढे म्हणाले. आम्ही येत्या एक ते दोन दिवसांमध्ये बीसीसीआयला आमचा निर्णय कळवू असेही ते म्हणाले. याबाबत खेळाडू आण संघ व्यवस्थापनाच्या सहमतीशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे बीसीबीचे प्रमुख एक्झिक्युटीव्ह निजामुद्दीन चौधरी यांनी म्हटल्याचे क्रिकबजने म्हटले आहे. सर्वात पहिले खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांशी याबाबत बोलणी करावी लागतील. या सर्वांची सहमती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा पूर्णपणे तांत्रिक मामला आहे. गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्यासाठी वेगळ्या प्रकारची तयारी कऱण्याची आवश्यकता असते, असे चौधरी म्हणाले. बांगलादेश, न्यूझीलंडकडून आलेल्या अशाप्रकारचा प्रस्ताव या अगोदर बांगलादेशने न्यूझीलंडकडून आलेल्या अशाप्रकारचा प्रस्ताव नाकारला होता. त्यावेळी गुलाबी चेंडूवर खेळण्याची तयारी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2BMJlJD

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...