दुबई: बांगलादेशचा कर्णधार याच्यावर दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर आयसीसीनं आता त्याचा बुकीसोबतचा व्हॉट्सअॅपवरील संवाद सार्वजनिक केला आहे. दीपक अग्रवाल नावाच्या बुकीनं २०१७मध्ये पहिल्यांदा शाकिबशी संपर्क साधला होता, असं आयसीसीनं सांगितलं आहे. त्यानंतर शाकिब त्याच्या कायम संपर्कात होता, असंही आयसीसीनं सांगितलं आहे. शाकिब अल हसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यानंतर अग्रवाल याच्याशी साधलेला व्हॉट्सअॅप संवाद आयसीसीनं उघड केला आहे. या बुकीनं शाकिबशी पहिल्यांदा २०१७मध्ये संपर्क साधला होता. त्यानंतर शाकिब त्याच्या कायम संपर्कात होता, असं आयसीसीनं स्पष्ट केलं. आयसीसीच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१७मध्ये जेव्हा प्रिमिअर लीगमध्ये शाकिब ढाका डायनामाइट्स संघात होता त्यावेळी कोणत्या तरी व्यक्तीनं बुकी अग्रवालला शाकिब हल हसनचा संपर्क क्रमांक दिला होता. अग्रवाल यानं एका व्यक्तीकडे बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे क्रमांक मागितले होते. १९ जानेवारी २०१८ रोजी अग्रवाल याने शाकिबला मेसेज करून बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका यांच्यातील सिरिजमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरल्यानंतर शुभेच्छा दिल्या होत्या. आयसीसीनं सांगितलं की, बुकीनं त्यानंतर हसनला आणखी एक मेसेज पाठवला आणि यावर आपल्याला काम करता येईल का किंवा आयपीएलपर्यंत मला थांबावं लागेल, अशी विचारणा केली होती. मेसेजमधील 'काम' या शब्दाचा अर्थ अग्रवाल याला सामन्यांची माहिती देणे असा होता. यानंतर त्यांच्यातील संवाद चालू राहिला. २३ जानेवारी २०१८ रोजी शाकिबला अग्रवालनं आणखी एक मेसेज पाठवला आणि या मालिकेत काही आहे का? असं विचारलं. शाकिब अल हसननं स्वतः या मेसेजबाबत कबुली दिली आहे. बांगलादेश-श्रीलंका आणि झिम्बॉब्वे यांच्यातील मालिकेसंदर्भात हा मेसेज होता, असं शाकिबनं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यावेळी शाकिबनं भ्रष्टाचारविरोधी समिती किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेला यासंदर्भात माहिती दिली नाही. नेमकं काय घडलं? जानेवारी २०१८मध्ये शाकिबची बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे मालिकेसाठी निवड झाली होती. यादरम्यान बुकी अग्रवाल आणि शाकिबमध्ये व्हॉट्सअॅपवर चर्चा झाली. १९ जानेवारी २०१८ रोजी शाकिबला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यावर अग्रवालनं त्याला शुभेच्छा दिल्या आणि आपण यावर काही काम करू शकतो का? किंवा मला आयपीएलपर्यंत वाट पाहावी लागेल, असं मेसेजमधून विचारलं. शाकिबनं अग्रवालनं संपर्क केल्याचं भ्रष्टाचारविरोधी समितीला कळवलं नाही. २३ जानेवारी २०१८ रोजी शाकिबला अग्रवालनं आणखी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला. या मालिकेत काही होऊ शकतं का, असं विचारलं. अग्रवाल यानं केलेला मेसेज या मालिकेबाबत होता आणि बुकीला या मालिकेतील अंतर्गत माहिती जाणून घ्यायची होती, अशी कबुली शाकिबनं दिलीय. २६ एप्रिलला पाठवलेल्या मेसेजमध्ये अनेक डिलिट केलेले मेसेजही मिळाले आहेत. या मेसेजमधून अग्रवालनं अंतर्गत माहिती मागितली होती असं स्वतः शाकिबनं सांगितलंय. शाकिबनं समितीला सांगितलं की, अग्रवालला कोणतीही माहिती दिली नाही. त्याच्याकडून कोणतीही ऑफर स्वीकारली नाही किंवा पैसेही घेतले नाहीत. मात्र, त्याच्याशी संपर्क झाल्याची माहिती समितीला किंवा अन्य यंत्रणेला दिली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34f7ODu
No comments:
Post a Comment