पुणे: बेधडक मतप्रदर्शनासाठी ओळखले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक यांनी बीसीसीआयच्या प्रशासक समितीबरोबरच सध्याच्या संघ निवड समितीवरही तोफ डागली आहे. 'भारतीय संघाची सध्याची निवड समिती 'मिकी माउस' निवड समिती आहे. ही समितीही कुठलंही अवघड काम करत नाही. वर्ल्डकपच्या वेळी यातले काही लोक अनुष्काला चहा देताना मी पाहिले आहेत,' असा गौप्यस्फोट इंजिनीअर यांनी केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना त्यांनी क्रिकेटमधील सध्याच्या प्रशासकीय परिस्थितीबद्दल 'मन की बात' केली. 'क्रिकेट संघ निवडणं हे कुठलंही आव्हानात्मक काम नसतं. तिथं विराटचीच जास्त चालते. अर्थात, ती चांगलीच गोष्ट आहे. पण मग निवड समितीच्या सदस्याचं काम काय? भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सर्व सदस्य मिळून जेमतेम १०-१२ कसोटी सामने खेळले असतील, असंही ते म्हणाले. विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा एक किस्साही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, विश्वचषक स्पर्धेच्या वेळी एका सिलेक्टरला तर मी ओळखलंही नाही. ब्लेझर घालून हा माणूस फिरत होता. चौकशी केली तेव्हा मला कळलं हा निवड समितीचा सदस्य आहे. तो फक्त अनुष्काला चहा देत होता. दिलीप वेंगसरकर यांच्या उंचीचा माणूस निवड समितीमध्ये असायला हवा, असंही ते म्हणाले. निवड समितीनं ऋषभ पंत याचा योग्य वापर करून घेतला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 'पंतला एकदिवसीय संघातून वगळायला नको होते. कार्तिकऐवजी विश्वचषकात त्याला संधी द्यायला हवी होती. महेंद्रसिंह धोनीसोबत खेळून त्याला उत्तम अनुभव मिळाला असता,' असं ते म्हणाले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 'एक क्रिकेटपटू बोर्डाचा कारभार पाहील ही चांगली गोष्ट आहे. कर्णधार म्हणून त्यानं संघासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. बोर्डाचा अध्यक्ष म्हणूनही तो हीच परंपरा कायम ठेवेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'त्यांचा हनीमून आता संपलाय' सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेली प्रशासकीय समिती म्हणजे केवळ वेळेची बरबादी होती. त्यांना क्रिकेटचं कुठलंही ज्ञान नव्हतं. डायना एडल्जीनी थोडंफार क्रिकेट खेळलं होतं. मात्र, कसोटी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटची समज असलेल्या माणसांची अशा ठिकाणी गरज असते. सर्वोच्च न्यायालय व लोढा समितीचा हेतू चांगला होता. मात्र तो प्रत्यक्षात उतरला नाही. प्रशासकीय समितीवर चुकीच्या लोकांची नियुक्ती झाली होती. माझ्या माहितीनुसार प्रशासकीय समितीला साडेतीन कोटी रुपये मानधनाच्या स्वरूपात मिळाले. याशिवाय बैठका व अन्य कारणांसाठी त्यांना हजारो रुपये दिले जात होते. ते एकप्रकारच्या हनीमूनवरच होते. तो हनीमून आता संपला आहे,' असं मत त्यांनी व्यक्त केलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36lhZZ5
No comments:
Post a Comment