रांची: भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. जिंकून मालिका ३-० ने खिशात घातली. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. एक संघ म्हणून आम्ही जी कामगिरी केली, त्याचा मला अभिमान वाटतो, असं म्हणाला. भारतीय क्रिकेट संघानं मायदेशात सलग ११ कसोटी मालिका जिंकून एक विक्रम केला आहे. रांची कसोटीत विजय मिळवल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्यानं संघातील खेळाडूंचं कौतुक केलं. 'खूपच जबरदस्त...एक संघ म्हणून आमची कामगिरी खूपच चांगली झाली. माझ्या संघाचा खूप अभिमान वाटतो. विदेशी दौऱ्यांमधील सामन्यांतही आम्ही झुंज दिली आहे, ' असं कोहली म्हणाला. कोहलीनं संघातील खेळाडूंच्या मानसिक दृढनिश्चयाचंही कौतुक केलं. ही मालिका आमच्यासाठी खूपच महत्वाची आणि चांगली होती, असंही तो म्हणाला. कोहलीनं या मालिकेत द्विशतकासह एकूण ३१७ धावा केल्या. तो म्हणाला, जगातील सर्वोत्कृष्ट संघ होण्यासाठी तुम्हाला बहुआयामी व्हायला हवं. आमच्या संघात केवळ इशांत शर्मा हाच अनुभवी जलदगती गोलंदाज होता. क्षेत्ररक्षकांनीही खूपच मेहनत घेतली. आमच्या संघसहकाऱ्यांनी टिपलेले झेलही अप्रतिम होते, असंही कोहली म्हणाला. संघिक खेळ बघण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. आमच्या गाठिशी जास्त अनुभव नव्हता, पण आमचा खेळ खूपच चांगला झाला, असं कोहली म्हणाला. आम्ही जगात कुठेही विजय मिळवू शकतो, असा विश्वास आहे. सामन्याचा निकाल हा बहुतांश वेळा माइंडसेट आणि मेहनतीवर अवलंबून आहे. केवळ कसोटीतच नाही तर आम्ही मर्यादित षटकांच्या सामन्यांतही चांगली कामगिरी करत आहोत, असं कोहलीनं सांगितलं. दक्षिण आफ्रिकेला रांची कसोटीत पराभूत केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली आहे. संघाच्या विजय प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान दिलं आहे. बऱ्याचदा भारताचे दोन खेळाडू चर्चेत असतात. मात्र, या मालिकेत जवळपास सगळ्याच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आणि तुम्हालाही हेच हवं असतं, असं शास्त्री म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N5FJri
No comments:
Post a Comment