नवी दिल्ली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवामुळे उपांत्या फेरीत जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. भारताचा हा पराभव पाकिस्तानी क्रिकेट संघाचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंच्या पचनी पडत नाहिए. यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार याचेही नाव जोडले गेले आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवावर वकारनेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळावर शंका उपस्थित केली आहे. संतप्त झालेल्या वकारने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही... तर, तुम्ही आयुष्यात काय करता यावरूनच तुम्ही कोण आहात हे ठरते. उपांत्य फेरीत पोहोचतो किंवा नाही याची मला मुळीच चिंता नाही, मात्र,एक नक्की आहे... काही चॅम्पियन्सच्या खिळाडूवृत्तीची परीक्षा घेतली गेली आणि ते त्यात वाईट पद्धतीने अपयशी ठरले', अशा शब्दांत वकार याने आपले म्हणणे मांडत आगपाखड केली आहे. या पूर्वी माजी क्रिकेटपटू बासिक अली आणि सिकंदर बख्त यांनीही भारतीय संघावर आरोप केले आहेत. पाकिस्तानी संघाला आयसीसी स्पर्धेबाहेर ठेवण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊ शकतो, असा आरोप बासित अली आणि सिकंदर बख्त यांनी केला आहे. इंग्लंडचे आता १० गुण झाले आहेत, तर पाकिस्तान ९ गुणांवर आहे. इंग्लंडचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे, तर पाकिस्तानचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. भारताच्या पराभवामुळे पाकला धक्का इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे ८ गुण असलेल्या इंग्लंड संघाने १० गुण कमावले आहेत. म्हणजेच इंग्लंड संघ ९ गुण असलेल्या पाकिस्तानच्या एका गुणाने पुढे गेला आहे. फॉर्मात आलेला इंग्लंड पुढचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल यात शंका नाही. म्हणजेच ११ गुण असलेले न्यूझीलंड आणि भारत यांच्यासह पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यातील एक संघ असे तीन संघ स्पर्धेत असणार आहेत. इंग्लंडचा भारताविरुद्ध पराभव झाला असता, तर इंग्लंडचे ८ गुण राहिले असते. तर इंग्लंड न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला असता तरी, इंग्लंडचे १० गुण झाले असते. पाकिस्तानने एका संघावर मात केल्यास त्याच्या खात्यात ११ गुण झाले असते. थोडक्यात भारताचा पराभव झाल्याने पाकपुढे अडचण निर्माण झाली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FHOMf6
No comments:
Post a Comment