बर्मिंगहॅमः विराट कोहलीची कोंडी करणे सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील कुठल्याच गोलंदाजाला जमत नाही, हे रविवारीही दिसून आले. आपल्या दमदार फलंदाजीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम रचले आहेत, तर बरेच विक्रम मोडूनही काढले आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या वनडे वर्ल्डकप लढतीत विराटने आणखी एक विक्रम रचला. वर्ल्डकप स्पर्धेत करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याचे हे ५४वे वनडे अर्धशतक ठरले आहे. विराटच्या आधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याने हा पराक्रमक केला होता. तसेच एकाच वर्ल्डकपमध्ये सलग पाचवेळा पन्नास प्लस धावांची खेळी करणारा विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा फिंच या कर्णधारांनी वर्ल्डकपमध्ये सलग चार अर्धशतके केली होती. विराटने त्यांना मागे टाकले आहे. त्याने स्पर्धेत याआधी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतके केली आहेत. दृष्टिक्षेप १)वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे. २)रविवारी इंग्लंडविरुद्ध झळकावलेले अर्धशतक हे विराटच्या कारकिर्दीतील ५४वे वनडे अर्धशतक ठरले. ३)वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावणारा विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/323qNAM
No comments:
Post a Comment