जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. वर्षभरात होणाऱ्या निवडणुका आणि सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारा मराठा मोर्चा, यांचं प्रतिबिंब निकालावर पडतं? की फक्त स्थानिक मुद्दे आणि स्थानिक राजकारण या निवडणुकीवर प्रभाव पाडेल, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त सकाळी दहा वाजता टपाल मतांच्या मोजणीनंतर इतर मतमोजणी सुरु होईल. सहा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रकिया पार पडेल. प्रत्येक प्रभागाला 2 असे 38 टेबल ठेवण्यात येणार आहेत. तसंच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. 55 टक्के मतदान जळगाव महापालिकेसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान झालं. 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 303 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झालं. पहिल्या सत्रात संथ प्रतिसाद देणाऱ्या जळगावकरांनी शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे जळगावात 55 टक्के मतदान झालं. भाजप-शिवसेनेत मुख्य लढत यंदाच्या निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व 75 जागा लढवणार आहे. तर शिवसेना 70 जागा लढवणार आहे. त्यामुळे इथे खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्येच होणार असल्याचं दिसतं. मात्र त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव महापालिका एकूण प्रभाग - 19 जागा - 75 उमेदवार - 303 मतदार - 3 लाख 65 हजार 72 मतदान केंद्रे - 469 जळगाव मनपा निवडणुकीतील प्रमुख लढती प्रभाग 5 अ 1-विष्णू भंगाळे [माजी महापौर ,विद्यमान शिवसेना] 2-सुनील माळी [भाजप] 3-हेमेंद्र महाजन [राष्ट्रवादी] प्रभाग 5 ब 1-राखी सोनावणे [माजी महापौर, शिवसेना] 2-जहाँ पठाण [भाजप] 3-मंगल देवरे [राष्ट्रवादी] प्रभाग 5 ड  1-नितीन लड्ढा [माजी महापौर, शिवसेना] 2-अनिल पगारिया [भाजप] प्रभाग 7 अ 1-सीमा भोळे [भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी] 2-साधना श्रीमाळ [शिवसेना] प्रभाग 11 अ 1-शामकांत बळीराम सोनावणे [शिवसेना] 2-पार्वता बाई भिल [भाजपा] 3-सायरा तडवी [ राष्ट्रवादी] प्रभाग 11 क 1-सिंधुताई कोल्हे [माजी महापौर ,भाजपा उमेदवार] 2-कमल म्हस्के [अपक्ष] 3-नीता सांगोले [अपक्ष] 4-अनिता सोनावणे [अपक्ष] प्रभाग 11 ड 1-ललित कोल्हे [विद्यमान महापौर, भाजप उमेदवार] 2-बुधा पाटील [शिवसेना] 3-शिवराम पाटील [काँग्रेस] 4-किशोर माळी [अपक्ष] प्रभाग 15 अ 1-सुनील महाजन [माजी उपमहापौर, शिवसेना] 2-मेहमूद बागवान [भाजप] 3-जाकीर बागवान [काँग्रेस] प्रभाग 19 अ 1-लता चंद्रकांत सोनावणे [शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी] 2-सारेफा रहमान तडवी [भाजपा उमेदवार]
from maharashtra https://ift.tt/2ACgmug
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...

from Times of India https://ift.tt/3stcMKs

मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
No comments:
Post a Comment