Ads

Thursday, August 2, 2018

सांगली मिरज कुपवाड निवडणूक निकाल 2018 Live

सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2018 आज जाहीर होत आहे. राज्याचं लक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक निकालाकडे लागलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 1ऑगस्टला सुमारे 60 टक्के मतदान झालं. सांगलीत 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम – 8 बहुरंगी लढत सांगली, मिरज, कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. अर्थात यामागे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, मदन पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला होता. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. वर्षांनुवर्षे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणारी भाजपा यात पुढे आहे. राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा देत दंड थोपटलेत. सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव महापालिकेचा आज निकाल  शिवसेना स्वबळावर शिवसेना 51 जगांसह यंदा प्रथमच सांगली मनपाची निवडणूक स्वबळावर लढतेय. “सांगलीच्या विकासाचे ध्येय ज्याच्याकडे आहे, सांगली चांगली करण्यासाठी जे धडपडत आहेत, त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात अली असून, शिवसेनेचा महापालिकेवर भगवा फडकेल” असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत शिवसेनेलादेखील पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागला आहे. कारण शिवसेनेत नाराज असलेल्या एका गटाने स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून 9 उमेदवार उभे केलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राज्याबरोबरच महापालिकेतील राजकारण सांभाळणारे काँग्रेसचे दिवगंत नेते पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या पश्चात ही महापालिकेची पहिलीच निवडणूक होतेय. त्यात भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. याचाच धसका घेत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडीचा मार्ग स्वीकारला आहे. “धर्मनिरपेक्ष विचारांची फूट होणार नाही आणि एकसंघपणे या शहराच्या विकासाची काळजी घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचा पुन्हा एकदा महापालिकेवर झेंडा फडकेल आणि यात राष्ट्रवादी पक्षाची मोलाची साथ लाभेल असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना वाटतोय. यानिमित्ताने जिल्हा परिषदेवेळी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची चूक यावेळी जयंत-विश्वजित जोडगोळीने सुधारली आहे. तसेच जयंत पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षपदी निवड झाल्याने जयंत पाटील यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पूर्ण ताकदीने भाजप मैदानात जिल्हा परिषदेचा ताबा मिळवल्यानंतर सांगली महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली आहे. भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले आहेत. मागील 20-22 वर्षांपासून काँग्रेस या महापालिकेत सत्तेत आहे. मात्र काँगेसने या शहराचा विकास दूरच या सांगलीचे खेडे बनवले असल्याचा आरोप केला आहे. याच बरोबर सांगलीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या, सांगली , मिरज, कुपवाड महापालिका काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करा अशी सादही भाजपच्या नेत्यांकडून घालण्यात आली आहे. तसेच या महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असा दावाही भाजपचे नेते करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांसाठी यंदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असताना पक्षांकडून तिकीट न मिळाल्याची संख्यादेखील मोठी आहे. आतापर्यंत अशा एकूण 35 नाराजांना अपक्ष विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असताना, आता या अपक्ष विकास आघाडीमुळे मतांमध्ये आणखी विभाजन होण्याची दाट शक्यता आहे, जी राजकीय पक्षासाठी आणखी एक मोठी डोकेदुखी ठरु शकते. सांगली महापालिका निवडणुकीतील ठळक मुद्दे - जिल्ह्यात वाढत चाललेली भाजपची ताकद रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीत आघाडी - भाजप - शिवसेनेचा मात्र सवतासुभा कायम , दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहेत. - जिल्हा परिषदेवर ताबा मिळवल्यानंतर महापालिकादेखील ताब्यात घेण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्याच्या होम ग्राऊंडवर पहिलीच निवडणूक असल्याने प्रतिष्ठा पणाला - कै. पतंगराव कदम, कै. मदन पाटील यांच्या पश्चात्य वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची ही पहिलीच निवडणूक - एकूण 78 पैकी 40 जागांवर काँग्रेस तर 29 जागांवर राष्ट्रवादी लढणार - 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि 4 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार देणार - भाजपने 20 प्रभागात 78 पैकी 77 उमेदवार जाहीर केले - शिवसेनेने 78 पैकी 52 ठिकाणी उमेदवार उभे केलेत - सांगली जिल्हा सुधार समिती  15 जागांवर निवडणूक लढवणार प्रमुख पक्ष आणि उमेदवार- एकूण जागा 78 काँग्रेस - 45 राष्ट्रवादी - 32 भाजप – 77 शिवसेना -45 स्वाभिमानी विकास आघाडी - 9 सुधार समिती - 15 संबंधित बातम्या   सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव महापालिकेचा आज निकाल
सांगली महापालिका निवडणुकीत 73 वर्षीय आजीबाईंची एंट्री
सांगली मिरज कुपवाड निवडणूक 2018: सांगलीकरांचा कौल कुणाला?

from maharashtra https://ift.tt/2OFED5O

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...