IPL 2022 : पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ मध्ये विराट कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर आता आरसीबीने त्याचा उत्तराधिकारी निवडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फॅफ डू प्लेसिसची नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. २०११ ते २०२१ पर्यंत संघाचा कर्णधार होता. आरसीबीने विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आगामी हंगामासाठी खूप उत्सुक दिसत आहे आणि त्याने फॅफला त्याच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीला आपल्या नेतृत्वाखाली एकदाही आरसीबीला जेतेपद मिळवून देता आले नाही, त्यामुळे आता फॅफच्या नेतृत्वाखाली आरसीबी आयपीएलचे जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की, “आम्ही लवकरच आमची मोहिम सुरू करणार आहोत, आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नवीन ऊर्जेने या हंगामाकडे वाटचाल करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फाफ डू प्लेसिस संघाचा नवा कर्णधार होणार आहे आणि मी माझ्या खास मित्रावर ही जबाबदारी सोपवतोय, याचा मला आनंद होऊ आहे. आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो. नवीन फ्रँचायझीचे नेतृत्व करण्यास आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास मी खूप उत्सुक आहे. कोहली पुढे म्हणाला, “फाफसोबतची भागीदारी आरसीबीच्या चाहत्यांसाठी खूप मजेशीर असणार आहे. तसेच मॅक्सवेल आणि इतर नवीन खेळाडूंबाबतही. आमचा संघ मजबूत आणि अतिशय संतुलित दिसत आहे. मी खूप आनंदी आहे. हा एक उत्तम हंगाम असणार आहे.” फाफचा संघ सहकारी आणि रॉयल चॅलेंजर्सचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सनेही डुप्लेसिसचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. डिव्हिलियर्सचा व्हिडिओही आरसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला. "फाफ हा एक अप्रतिम नेता आणि या भूमिकेसाठी योग्य माणूस आहे,'' असे एबीने म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/ym1F0ri
No comments:
Post a Comment