मुंबई : महान फिरकीपटू शेन वॉर्नचे थायलंडमध्ये निधन झाले आणि क्रिकेट जगताने हळहळ व्यक्त केली. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी वॉर्नबाबत जी भविष्यवाणी सांगितली होती, तीदेखील खरी ठरली. सुनील गावस्कर यांनी शेन वॉर्नबाबत नेमकी कोणती भविष्यवाणी केली होती, पाहा...गावस्कर यांनी वॉर्नबाबत एक भविष्यवाणी वर्तवली होती. जेव्हा गावस्कर यांनी ही गोष्ट सांगितली होती, तेव्हा त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पण अखेर ही भविष्यवाणी खरी ठरल्याचे त्यानंतर पाहायला मिळाले. ही गोष्ट आहे १९९९ सालची. त्यावेळी इंग्लंमध्ये क्रिकेट विश्वचषक सुरु होता आणि ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम सामना सुरु होणार होता. त्यावेळी गावस्कर यांनी वॉर्नबाबत भविष्यवाणी वर्तवली होती आणि ती तंतोतत खरी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. गावस्कर यांना अंतिम सामन्यापूर्वी समालोचन करत असताना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी या अंतिम फेरीत सामनावीर कोण ठरेल? असा प्रश्न गावस्कर यांना विचारला होता. त्यावेळी गावस्कर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ' या सामन्यात शेन वॉर्न सामनावीर ठरू शकतो' अशी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी बऱ्याच जणांना या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. कारण पहिली गोष्ट म्हणजे हा सामना क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सच्या मैदानात होणार होता. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना नेहमीच मदत मिळते, पण फिरकी गोलंदाजांसाठी पोषक वातावरण नसते. त्यामुळे शेन वॉर्न कसा काय सामनावीर ठरू शकतो, हा पश्न सर्वांना पडला होता. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा संघ हा फिरकी गोलंदाजीला समर्थपणे सामना करण्यात तरबेज होता. त्यामुळे ते शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर चांगल्या धावा वसूल करतील, असे काही जणांना वाटत होते. पण या सामन्यात घडले मात्र वेगळेच. अंतिम सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्या शेन वॉर्नने ९ षटकांमध्ये फक्त ३३ धावा देत पाकिस्तानच्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत फक्त १३२ धावाच करू शकला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्स राखत जिंकला आणि विश्वचषकाला गवसणी घातली होती. वॉर्नने या सामन्यात सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे गावस्कर यांनी वॉर्नबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/MIvhSmK
No comments:
Post a Comment