कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला आज गुरुवारपासून थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कानपूरच्या ग्रीप मार्क स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. भारताच्या फिरकी आक्रमणासमोर खेळण्याचे आव्हान न्यूझीलंडसमोर असणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताचे या मैदानावरील रेकॉर्ड होय. दुसरे कारण म्हणजे या मैदानावर न्यूझीलंडला भारताविरुद्ध कधीच विजय मिळवता आलेला नाही. वाचा- या दोन्ही संघात आतापर्यंत कानपूरमध्ये ३ लढती झाल्या आहेत. याआधी २०१६ साली भारताने न्यूझीलंडविरुद्ध या मैदानावर कसोटी मॅच खेळली होती. तेव्हा भारताने १९७ धावांनी त्यांचा पराभव केला होता. त्याच्याआधी १९९९ साली झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता तर १९७६ साली दोन्ही संघात झालेली मॅच ड्रॉ झाली होती. हे झाले न्यूझीलंडविरुद्धचे रेकॉर्ड आता सर्व संघांविरुद्धची भारताची या मैदानावरील कामगिरी पाहिली तर ती देखील शानदार अशीच आहे. या मैदानावर १९८३ साली भारताचा अखेरचा पराभव झाला होता. त्यानंतर या मैदानावर एक तर भारताने विजय मिळवला आहे किंवा सामना ड्रॉ झालाय. वाचा- दोन सामन्यांची ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. WTC मधील ही भारताची दुसरी तर न्यूझीलंडची पहिली मालिका आहे. न्यूझीलंड या पहिल्या मालिकेची सुरूवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. पण भारताचे घरच्या मैदानावरील रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडिया या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांच्या शिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आव्हान कमी असणार नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. पहिला कसोटी सामना सुरू होण्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर केएल राहुलला दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता शुभमन गिलला मधळ्या फळीत स्थान मिळणार नाही. त्याला सलामीला पाठवावे लागले. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर पदार्पण करू शकतो. पण अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताचे फिरकी आक्रमण मजबूत आहे. २०१६ साली या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजा आणि अश्विन जोडीने २० पैकी १६ विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xn7eTS
No comments:
Post a Comment