नवी दिल्ली : आयपीएलमधील खेळाडू आणि चाहत्यांसाठी आज मोठा दिवस होता. कारण आयपीएलमधील संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवतात, हे आज सर्वांसमोर आले आहे. मुंबई इंडियन्स मुंबईच्या संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. रोहितबरोबर यावेळी मुबंई इंडियन्सने जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीला पहिला खेळाडू म्हणून रिटेन केला नाही. त्यामुळे धोनीला यावेळी १६ कोटी रुपये मिळणार नाहीत. चेन्नईच्या संघाने पहिल्यांदा रिटेन करण्यासाठी रवींद्र जडेजाला पसंती दिली आहे. त्यामुळे जडेजाला यावेळी १६ कोटी रुपये मिळाले आहे. चेन्नईने रिटेन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे नाव धोनीचे घेतले असून त्याला १२ कोटी रुपये देण्यात येतील. चेन्नईच्या संघाकडून मोईन अली आणि ऋतुराज गायकवाडला रिटेन करण्यात आले आहे. चेन्नईने त्यांना अनुक्रमे ८ आणि ६ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. आरसीबीआरसीबीच्या संघाने यावेळी तीन खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला खेळाडू विराट कोहली असून त्याला १५ कोटी रुपये मोजत आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. कोहलीबरोबरच ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला ७ कोटी मोजत आरसीबीने आपल्या संघात कायम ठेवले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबपंजाबच्या संघाने यावेळी लोकेश राहुलला संघाबाहेर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. पंजाबने यावेळी सलामीवीर मयांक अगरवाल आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघात कायम ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादहैदराबादच्या संघाने यावेळी कर्णधार केन विल्यम्सन, अब्दुल समद आणि उमरान मलिक या तीन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सदिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यावेळी चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, यामध्ये कर्णधार रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एनरिच नॉर्टजे यांना कायम ठेवले आहे. कोलकाता नाइट रायडर्सकोलताच्या संघाने यावेळी आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरिन यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सराजस्थान रॉयल्सच्या संघाने यावेळी कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना कायम ठेवले आहे. राजस्थानच्या संघाने यावेळी बेन स्टोक्सला कायम न ठेवत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3I4Nw4v
No comments:
Post a Comment