नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी चार खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच धक्का दिला. कारण यापूर्वी मुंबईचा संघ फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केल, असे मत वर्तवले जात होते. मुंबईच्या संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. रोहितबरोबर यावेळी मुबंई इंडियन्सने जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना संघात कायम ठेवेल, असे म्हटले जात होते. मुंबईच्या संघाने १६ कोटी रुपये मोजत रोहितला संघात कायम ठेवले, त्याचबरोबर बुमरासाठी त्यांनी यावेळी १२ कोटी रुपये मोजले. या दोघांनंतर मुंबईच्या संघाने तिसऱ्या स्थानावर पसंती दिली ती सूर्यकुमार यादवला. मुंबईच्या संघाने आठ कोटी रुपये मोजत सूर्यकुमारला आपल्या संघात कायम ठेवले. मुंबईच्या संघाने यावेळी उपकर्णधार कायरन पोलार्डला सहा कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात कायम ठेवले आहे. रिटेशनचे नियम होते तरी काय, जाणून घ्या... आयपीएलमध्ये यावेळी मोठा लिलाव होणार आहे. प्रत्येक संघाला लिलावासाठी एकूण ९० कोटी रुपयांची मुभा दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम कोणताही संघ वापरू शकत नाही. पण एखाद्या संघाने जर चार खेळाडूंना रिटेन करायचे ठरवले तर त्यांच्याकडील ९० कोटींमधून ४२ कोटी रुपये वजा होणार आहेत. पण प्रत्येक संघाने चार खेळाडूंनाच रिटेन करायलाच हवे, असे काही नाही. जर एखाद्या संघाने तीन खेळाडूंना रिटेन केले तर त्यांचे ३३ कोटी रुपये खर्च होतील, त्याचबरोबर जर एखाद्या संघाने दोन खेळाडूंना रिटेन केले तर त्यांच्याकडील २४ कोटी रुपये खर्च होतील. समजा एखाद्या संघाने फक्त एकाच खेळाडूने रिटेन करायचे ठरवले तर त्यांना १४ कोटी रुपये खर्च करावे लागतील. जर एखाद्या अनकॅप खेळाडूला (म्हणजे जो देशाकडून राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलेला नाही) एखाद्या संघाने रिटेन करायचे ठरवले तर त्यांच्याकडील ४ कोटी रुपये खर्च होतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3DchzmW
No comments:
Post a Comment