हरारे : आणि यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. यजमान झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र झिम्बाब्वेच्या डावाची सुरवात चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर तंबूत परतले. पण मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलरने रेगिस चकाब्वासोबत डाव सावरला. पण धावफलकावर संघाच्या 100 धावा झळकण्याआधीच चकाब्वा 26 धावांवर शकीब-अल-हसनचा बळी ठरला. टेलरने एका बाजूने किल्ला लढता ठेवला होता. अर्धशतकासाठी 4 धावांची गरज असताना टेलर विचित्र पद्धतीने बाद झाला. वाचा- 25 षटकात झिम्बाब्वेची धावसंख्या होती, तीन बाद 111 धावा. आणि गोलंदाजी करत होता शोरिफूल इस्लाम. षटकातील दुसरा चेंडू शोरिफूलने बाउन्सर फेकला, तो टेलरने मागे जाऊ दिला, पण बाउन्सर सोडत त्याने आपली बॅट मागे नेली आणि ती बॅट स्टंपला जाऊन धडकली. बेल्स खाली पडल्याने पंचांनी टेलरला हिटविकेट म्हणून बाद केले. टेलरच्या विचित्र पद्धतीने बाद होण्यावर सध्या बरीच चर्चा रंगली आहे. टेलरने 46 धावा केल्या, तो आज चांगल्या लयीत खेळत होता. वाचा- वाचा- ... टेलर आउट की नॉट आउट? काय म्हणतो नियम एमसीसीच्या नियमांनुसार, ब्रेंडन टेलरला बाद घोषित करणं चुकीचं होतं. कारण टेलरने चेंडू खेळला आणि तो यष्टीरक्षकाकडे जाऊ दिला. त्यानंतर त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुऴे टेलरला बाद ठरविण्यासाठी कोणताही मुद्दा नव्हता. शॉट पूर्ण झाल्यानंतर टेलरची बॅट स्टंपला धडकली. दुसरीकडे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला होता. त्यामुळे तेथे बॉल पूर्ण झाला होता. त्यामुळे टेलरला आउट करार देणे चुकीचे होते. वाचा- दरम्यान, आयसीसी विश्वचषक 2019मध्ये वेस्ट इंडीज आणि अफगानिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावेळी ओशान थॉमसदेखील अशाच प्रकारे बाद झाला होता. पण मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचाशी याबाबत चर्चा केल्यानंतर पंचांनी त्याला नाबाद घोषित केले होते. वाचा- त्यानंतर झिम्बाब्वेने 50 षटकात 9 बाद 240 अशी आव्हानात्मक धावसंख्या बांगलादेशसमोर उभी केली. वेस्ले मधेव्हरेने 56 धावांची अर्धशतकी खेळी केल्याने झिम्बाब्वेला 240 धावांपर्यंत मजल मारता आली. झिम्बाब्वे आणि बांगलादेशमधील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे स्थगित करण्यात आला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3itISkG
No comments:
Post a Comment