नवी दिल्ली : इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आज क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. स्टोक्सने इंग्लंडला २०१९ झालेला विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्टोक्सला मोठी जबाबदारी देण्यात आली होती. पण स्टोक्सने आज अचानक आपण अनिश्चितकाळासाठी विश्रांती घेत असल्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने याबाबतची पूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, " बेन स्टोक्सने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टोक्स आता आगामी भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. आपल्या मानसीक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यासाठीही त्याने ही विश्रांत घेतली आहे." इंग्लंडला २०१९ साली झालेला विश्वविजयात स्टोक्सने सिंहाचा वाटा उचलला होता. या सामन्यात अखेरच्या काही षटकांमध्ये त्याने इंग्लंडचा डाव फक्त सांभाळला नव्हता तर त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर बरेच सामना स्टोक्सने गाजवले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या कुटुंबियातील काही व्यक्तींची प्रकृती चांगली नव्हती आणि त्याने त्यासाठी क्रिकेटमधून ब्रेकही घेतला होता. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्यावर इंग्लंडच्या संघाने महत्वाची जबाबदारी सोपवली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ४ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्याने अचानकपणे हा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता इंग्लंडला त्याच्याजागी बदली खेळाडूची निवड करावी लागणार आहे. इंग्लंडच्या काही खेळाडूंचे यापूर्वी मानसीक स्वास्थ बिघडल्याच्या घटना घडल्या होत्या. इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉट हे एक त्यामधील उत्तम उदाहरण आहे. आता स्टोक्सने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे स्टोक्स आता मैदानात पुन्हा कधी उतरणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे आता स्टोकच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे डोळे लागलेले असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37b92TW
No comments:
Post a Comment