कोलंबो: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी तेव्हा मोठा झटका बसला जेव्हा संघातील ऑलराउंडर करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यामुळे काल २७ जुलै रोजी होणारी दुसरी टी-२० लढत स्थगित करण्यात आली. क्रिकेटमध्ये बायो बबलमध्ये असताना एखाद्या खेळाडूला करोनान होण्याची ही पहिली वेळ नाही. वाचा- ... क्रुणाल पंड्याला मंगळवारी सकाळी त्रास जाणवला. त्यानंतर भारतीय संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याची रॅपिड एटीजन टेस्ट केली आणी ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याची आरटी-पीसीआर टेस्ट देखील झाली होती आणि त्याचा निकाल देखील पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दुसऱ्या बाजूला श्रीलंका संघातील कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही. त्याची बुधवारी पुन्हा एकदा टेस्ट केली जाणार आहे. वाचा- भारतीय क्रिकेट संघ गेल्या एक महिन्यापासून बायो बबलमध्ये आहे. असे असताना क्रुणाल पंड्या कसा काय करोना पॉझिटिव्ह झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे क्रुणाल पंड्या एखाद्या बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात कसा काय आला ज्यामुळे त्याला करोनाची लागण झाली हा मोठा प्रश्न आहे. वाचा- भारतीय संघ कोलंबोच्या ताज समुद्र हॉटेलमध्ये थांबला आहे. याच ठिकाणी क्रुणालला करोनाची लागण झाली असावी अशी शक्यता आहे. लॉजिस्टिक्स स्टाफ बस चालक किंवा ग्राउंडवर कॅटरिंग स्टाफ आदीच्या संपर्कामुळे क्रुणाल पॉझिटीव्ह झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा- क्रुणाल पंड्या पॉझिटिव्ह आल्याने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांचे इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचे लांबणीवर पडू शकते. भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-२० सामना झाल्यानंतर त्यांना इंग्लंडला रवाना व्हायचे होते. आता सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार या दोघांचे इंग्लंडला जाणे लांबणीवर पडू शकते. यामुळे चार ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत या दोघांना संधी मिळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3BO69Xf
No comments:
Post a Comment