कोलंबो : दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताची बिकट अवस्था असली तरी भारतीय ंसघाने यावेळी श्रीलंकेला चांगलेच झुंजवले. भारताने यावेळी विजयासाठी श्रीलंकेपुढे १३३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने यावेळी श्रीलंकेच्या फलंदाजांना ठराविक फरकाने बाद केले होते. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी आठ धावांचे आव्हान समोर होते. श्रीलंकेने यावेळी चार विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर श्रीलंकेने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारताचा आव्हान करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले होते. फिरकीपटू कुलदीप यादवने यावेळी अचूक मारा करत श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारसह अन्य भारतीय गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. त्यावेळी भारताकडून १०-१५ धावा कमी झाल्याचे वाटत होते. पण तरीही भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत सामना अखेरच्या षटकापर्यंत आणला होता. भारताचा कर्णधार शिखर धवन आणि पदार्पण करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने यावेळी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी यावेळी भारताला ४९ धावांची सलामी करून दिली. पण यावेळी बाऊन्सरवर मोठा फटका मारण्याच्या नादात ऋतुराज बाद झाला. आपल्या पहिल्याच सामन्यात ऋुतराजला २१ धावा करता आल्या. ऋतुराज बाद झाला असला तरी त्यानंतर शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. धवनने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर खेळपट्टीवर देवदत्त पडीक्कल आणि संजू सॅमसन हे दोन युवा फलंदाज होते. पडीक्कलने यावेळी आक्रमक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. पडीक्कलने यावेळी २३ चेडूंत १ षटाकर आणि एका चौकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. पण पडीक्कल आणि संजू सॅमसन या दोघांनाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. संजूला यावेळी सात धावांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी भारताची ४ बाद १०४ अशी स्थिती झाली होती. भारतीय संघात यावेळी पाच फलंदाजच होते. त्यामुळे भारतीय संघ किती धावसंख्या उभारतो, याकडे सर्वाचे लक्ष होते आणि भारताने यावेळी श्रीलंकेपुढे १३३ धावांचे आव्हान ठेवले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3l2J8df
No comments:
Post a Comment