कोलंबो : दुसरा ट्वेन्टी-२० सामना मंगळवारी रंगणार आहे आणि या लढतीत भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. भारताने पहिला ट्वेन्टी-२- सामना जिंकला असला तरी या लढतीमध्ये काही खेळाडू अपयशी ठरले होते. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मोठे बदल होणार असल्याचे दिसत आहे. १. पहिला बदलआतापर्यंत हार्दिक पंड्याला या दौऱ्यात फॉर्मात नसतानाही बऱ्याच संधी दिल्या आहेत. पण हार्दिकच्या कामगिरीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत नाही. हार्दिकने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात एक सोपा झेलही सोडला होता. त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये तो लयीत असल्याचे दिसत नाही. त्याच्याकडून चांगल्या धावा पाहायला मिळल्या नाहीत, त्याचबरोबर संघाला गरज असताना तो खेळपट्टीवर उभादेखील राहीलेला नाही. गोलंदाजीमध्येही हार्दिकला चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात हार्दिकला वगळण्यात येऊ शकते. कामगिरीत सातत्य न राखल्यामुळे त्याची संघातील जागा आता पक्की राहीलेली दिसत नाही. २. दुसरा बदलभारतीय संघात दुसरा बदल हा फिरकी गोलंदाजीमध्ये होऊ शकतो. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर वरुण चक्रवर्तीला संघाबाहेर ठेवण्यात येऊ शकते आणि त्याच्याजागी संघात राहुल चहरला जागा मिळू शकते. कारण राहुल चहरने वनडे सामन्याच चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यानंतरही त्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा दुसरा बदल संघात होऊ शकतो. ३. तिसरा बदलआतापर्यंत देवदत्त पडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना एकही सामना खेळायला मिळालेला नाही. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पदार्पणाच्या सामन्यात त्याला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याच्याजागी ऋतुराज किंवा देवदत्त या दोघांपैकी एकाला संधी देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारताच्या सलामीमध्ये नेमका कोणता बदल होतो, याची उत्सुकता संघाला नक्कीच असेल. ४. चौथा बदलपहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन्ही यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली होती. या दोघांमध्ये इशानपेक्षा संजूने जास्त चांगली फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. इशान हा धावा जमवण्यासाठी झटत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात एकाच यष्टीरक्षकाला संधी देण्यात येईल आणि बहुतेक इशानला या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघापासून दूर ठेवण्यात येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zBnVen
No comments:
Post a Comment