कोलंबो : भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात संघातील बदलांचा चांगलाच सामना बसला. त्यामुळेच भारतीय संघाला २२५ धावांवरच समाधान मानावे लागले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी हे आव्हान लीलया पेलले. पण या पराभवानंतरही मालिका विजय हा भारताचाच झाला आहे. कारण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. आजचा सामना पराभूत झाल्यावरही मालिकेचा निकाल भारताच्याच बाजूने २-१ असा लागला आहे. भारताच्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सहाव्या षटकातच पहिला धक्का बसला. संघात पदार्पण करणाऱ्या के. गौतमने यावेळी श्रीलंकेच्या सलामीवीराला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षा (६५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली. पण यावेळी युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने भानुकाला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. चेतन फक्त तेवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतरच्याच षटकात चेतनने धनंजय डीसिल्व्हाला बाद करत श्रीलंकेला दुहेरी धक्के दिले. पण त्यावेळी श्रीलंकेची बाजू फर्नांडोने सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्वाधिक ७६ धावा करून बाद झाला. आज पहिल्यांदाच भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने संपूर्ण गोलंदाजी बदलली होती, त्यामुळे फलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. पण ही जबाबदारी पेलवण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. शिखर १३ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पृथ्वी आणि संजू सॅमनस यांनी ७० धावांची भागिदारी केली. पृथ्वी ४९ धावांवर बाद झाला. पृथ्वी पाठोपाठ संजू सॅमसनही ४६ धावा करत माघारी परतला. मनीष पांडेही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि भारताची अवस्था ४ बाद १५७ अशी झाली. मैदानावर असलेल्या सूर्यकुमार यादव आणि हार्दिक ही जोडी संघाला मोठी धावसंख्या उभी करुन देतील असे वाटले होते. पण हार्दिक पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, त्याचबरोबर स्थिरस्थावर झालेला सूर्यकुनार यादवही ४० धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव गडगडला. श्रीलंकेने ४३.१ षटकात भारताचा २२५ धावांवर सर्वबाद केला. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी माफक आव्हान मिळाले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VawYUv
No comments:
Post a Comment