नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार सोशल मीडियापासून दूर असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळता दिसतो. धोनीला चाहत्यांनी २०१९च्या वर्ल्सकप सेमीफायनलमध्ये शेवटचे भारतीय जर्सीमध्ये पाहिले होते. तेव्हा भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्या लढतीनंतर धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घेतली. धोनी आता फक्त चेन्नई सुपर किंग्जच्या यलो जर्सीमध्ये दिसतो. पण आज जेव्हा धोनीला पुन्हा एकदा यलो जर्सीमध्ये पाहिले तेव्हा सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. एका जाहिरातीसाठी धोनीने चित्रपट निर्माती फराह खान सोबत दिवस घालवला. फराह खान कोरियोग्राफर देखील असून तिला क्रिकेटची आवड आहे. भारताच्या या माजी कर्णधाराला भेटल्यानंतर फराह देखील त्याची फॅन झाली. तिने इस्टाग्रामवर धोनी सोबत एक फोटो शेअर केला आहे. फराहचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहते हा फोटो पाहून भावनिक झाले. धोनीला भारताच्या जर्सीत पाहिल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केलाय. या फोटोवर अभिनेता रणवीर सिंहने देखील कमेंट केली आहे. रणवीर १९८३च्या वर्ल्डकप विजेत्या संघावर चित्रपट तयार करत असून तो कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएमध्ये खेळताना दिसतोय. २०२० च्या आयपीएलध्ये धोनीच्या सीएसके संघाला अपयश आले होते. पण २०२१ च्या पहिल्या सत्रात चेन्नईने धमाकेदार कमागिरी केली. करोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल आता युएईमध्ये होणार आहे. हे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3j7G3WP
No comments:
Post a Comment