
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. पण जाहीर केल्यावर धोनीने पाच मिनिटांमध्येच एका व्यक्तीची आवर्जुन भेट घेतल्याचे आता समोर आले आहे. ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण, पाहा... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रमाणे महेंद्र सिंह धोनीचे करिअर, त्याचे कर्णधापद आणि विकेटकिपिंग यांना वेगळे स्थान आहे. त्याच प्रमाणे त्याच्या निवृत्तीला वेगळे स्थान मिळाले आहे. शनिवारी संध्याकाळी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धोनीने निवृत्ती जाहीर केली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला एकच धक्का दिला. धोनीची निवृत्ती हा क्रिकेट विश्वासाठी एक मोठा धक्का होता. कारण धोनीची आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईला आला होता. त्यामुळे धोनी आयपीएलचाच विचार करत असेल, असे सर्वांना वाटत होते. पण तसे घडले नाही. आयपीएलचा सराव सुरु करण्यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. या निवृत्तीनंतर धोनीने एका व्यक्तीची खास भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. धोनीने जेव्हा आपली निवृत्ती जाहीर केली तेव्हा चेन्नईच्या संघातील काही व्यक्ती तिथे होत्या. निवृत्ती जाहीर केल्यावर धोनीने संघातील सहाय्यक प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांची भेट घेतली. धोनी जेव्हा निवृत्ती घेतल्यावर बालाजी यांच्याकडे आला तेव्हा त्यांना काहीच सुचत नव्हते. कारण त्यांच्यासाठीही हा एक मोठा धक्का होता. याबाबत बालाजी यांनी सांगितले की, " धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली आणि पाच मिनिटांमध्येच तो माझ्याजवळ आला. त्यावेळी धोनी नेमकं काय बोलणार, हे मला माहिती नव्हते. धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाने मलाही धक्का बसला होता. पण धोनी माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले की, मी पिचची देखभाल करणाऱ्या व्यक्तींना जास्त पाणी मारायला सांगितले आहे. निवृत्तीनंतरही धोनी क्रिकेटबद्दल एवढा बारीक विचार करतो, हे पाहून मला दुसरा धक्का बसला." धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नसला तरी तो आयपीएलमध्ये मात्र नक्कीच खेळणार आहे. त्यामुळे धोनीचा खेळ आता आयपीएलमध्ये कसा होतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hnmzuX
No comments:
Post a Comment