
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने शनिवारी आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी दुबईत पोहोचलेल्या दोघा खेळाडूंना करोना झाल्याची माहिती दिली. पण बोर्डाने नेमक्या कोणत्या खेळाडूंना करोना झाला आहे याची माहिती मात्र दिली नाही. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्या खेळाडूंना करोना झाला आहे त्यामध्ये याचा देखील समावेश असल्याचे समजते. दीपकची बहिण मालती चाहरने भावाचा फोटो शेअर करत एक मेसेज पोस्ट केला आहे. शनिवारीच बीसीसीआयने १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले होते. यात दोघे खेळाडू आहेत. हे सर्व जण चेन्नई संघातील आहेत. चेन्नई संघातील २३ वर्षीय खेळाडू ऋतुराज गायकवाड याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता दीपक चाहरला देखील करोना झाल्याचे समजते. अर्थात बीसीसीआयकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले नाही. वाचा- तु एक सच्चा योद्धा आहेस, ज्याचा जन्म लढण्यासाठी झालाय. रात्रीच्या अंधारानंतर दिवस होतोच. मला आशा आहे की तु पुन्हा शानदार कमबॅक करशील. मी त्याची वाट पाहते, असा मेसेज मालतीने लिहला आहे. मालती शिवाय त्याचा भाऊ राहुल चाहरने देखील ट्विट करून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- देशात करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आयपीएलचा १३वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी चेन्नई संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैनाने वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात आता दोन खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाल्याने चेन्नई संघाला मोठा शॉक बसला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lrP8dn
No comments:
Post a Comment