
नवी दिल्ली: भारताचा रिटेल किंग अशी ओळख असलेले यांनी त्यांचा रिटेल व्यवसाय यांच्या विकला. २४ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार गेल्या शनिवारी झाला. कर्जाच्या संकटात सापडलेल्या बियानी यांनी आता त्यांचा आणखी एक व्यवसाय विक्रीला काढल्याचे समजते. साडी विक्रीचा व्यवसाय ते बिग बाजारपर्यंत असा प्रवास करणाऱ्या बियानी आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठे कर्ज आहे. १९८७ साली त्यांनी पॅटलूनची सुरूवात केली होती. पण पैसे कमी पडू लागल्याने २०१२ साली हा व्यवसाय आदित्य बिर्ला ग्रुपला विकला. पॅटलून आणि बिग बाजारची सुरुवात कोलकातामधून झाली होती. २००१ साली बियानी यांनी संपूर्ण देशात स्टोअर सुरू केले. आता फ्यूचर ग्रुपची रिटेल व्यवसायची विक्री केल्यानंतर ते त्यांचा आणखी एक व्यवसाय विकणार आहेत. वाचा- रिटेल व्यवसायानंतर आता किशोर बियानी त्यांचा विमा व्यवसाय देखील विकणार आहेत. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांची नवी टेक्नोलॉजीज प्राव्हेट लिमिटेड ही कंपनी बियानी यांचा विम्याचा व्यवसाय विकत घेण्याची शक्यता आहे. बियानी यांची फ्यूचर जनरल लाइफ इश्योरन्स (Future Generali Life Insurance) ही कंपनी विमा क्षेत्रात काम करते. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार हा करार १ हजार ४०० ते १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. Future Generali Life Insurance ही एक जॉइंट वेंचर कंपनी आहे. यात फ्यूचर ग्रुपचा ५७.६२ टक्के हिस्सा आहे. त्या शिवाय इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे १६.८८ आणि Generali चे २५.५ टक्के इतका हिस्सा आहे. वाचा- या संदर्भात माहिती ठेवणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या करारासाठी चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्याची घोषणा केली जाऊ शकते. या करारासाठी UBS बँक फ्यूचर ग्रुपची सल्लागार म्हणून काम करत आहे. पण अद्याप सचिन बन्सल किंवा फ्यूचर ग्रुपकडून यासंदर्भात अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. वाचा- शनिवारी फ्यूचर ग्रुपचे रिटेल, होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग बिझनेस शनिवारी रिलायन्सने विकत घेतले होते. रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपच्या रिटेल, होलसेल आणि लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंगचे ३१ मार्च २०२० पर्यंतचे १९ हाजर कोटी हून अधिक रुपयांचे कर्जे स्वत:कडे घेतले आहे. त्यानंतर १ एप्रिल ते पूर्ण मालमत्ता रिलायन्सकडे वर्ग होईपर्यंतचे कर्ज फ्यूचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ किशोर बियानी यांना द्यावे लागले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hPrPaU
No comments:
Post a Comment