Ads

Saturday, August 29, 2020

चेन्नईला आणखी एक धक्का; रैना भारतात परतला

मुंबई : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला ग्रहण लागलं आहे. टीममध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. वैयक्तिक कारणांसाठी स्टार खेळाडू भारतात परतला असून तो उर्वरित आयपीएलसाठी उपलब्ध नसेल, असं सीएसके व्यवस्थापनाने जाहीर केलंय. अष्टपैलू सुरेश रैना संघात नसल्यामुळे चेन्नईसाठी हा मोठा धक्का मानला जातो. सुरेश रैनाने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. चेन्नईच्या संघासोबत तो २१ ऑगस्टलाच दुबईत आयपीएलसाठी दाखल झाला. दुबईला जाण्यापूर्वी झालेल्या ५ दिवसांच्या कॅम्पमध्येही त्याने महेंद्रसिंह धोनी, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, अंबाती रायुडू, एम विजय आणि गोलंदाजी सल्लागार लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत सहभाग घेतला होता. दुबईत गेल्यापासून चेन्नईचा संघ कॉरंटाईन होता. आणखी काही दिवस चेन्नईला कॉरंटाईन केलं जाणार आहे. कारण, संघातील काही सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. एकीकडे करोनाचा टीममध्येही शिरकाव झालेला असताना रैनाची आयपीएलमधून माघार हा चेन्नईसाठी आणि चाहत्यांसाठीही मोठा धक्का आहे. रैनाने आयपीएलमध्ये १६४ सामन्यात आतापर्यंत ४५२७ धावा कुटल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर त्याने चेन्नईसाठी अनेक मॅच विनिंक खेळी केल्या. रैना ५३६८ धावांवर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे फक्त विराट कोहलीचा समावेश आहे. याशिवाय रैनाने आयपीएलमध्ये १०२ झेल घेतले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lt8n6e

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...