Ads

Friday, August 21, 2020

एकाच दिवशी दोन शतक; फक्त भारतीय खेळाडूच्या नावावर आहे हा विक्रम

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे अद्याप पूर्वत झाले नाही. पण क्रिकेटच्या इतिहासात असे काही खेळाडू झाले आहे ज्यांनी शानदार कामगिरी केली आहे. असाच एक विक्रम भारतीय खेळाडूच्या नावावर आहे. एकच दिवशी दोन वेळा शतकी खेळी करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूने केला होता. क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम प्रथमच झाला होता. जाणून घेऊया या विक्रमाबद्दल... वाचा- आजच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी १८९६ मध्ये भारताच्या कुमार श्री यांनी एक अनोखा विक्रम केला होता. इंग्रजांकडून खेळणाऱ्या भारताच्या या खेळाडूने प्रथम श्रेणीतील सामन्या एकाच दिवशी दोन वेळा शतकी खेळी केली होती. वाचा- रणजीत सिंहजी यांनी इंग्लंडकडून कसोटीत जुलै १८९६ साली पदार्पण करत नाबाद १५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर एक महिन्यांनी इंग्लंडमधील होव शहरात ससेक्स संघाकडून खेळताना त्यांनी यॉर्कशायरविरुद्ध एकाच दिवशी दोन शतकी खेळी केली. यात १०० आणि नाबाद १२५ धावांचा समावेश होता. यॉर्कशायरने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ससेक्सचा संघ तिसऱ्या दिवशी १९१ धावांवर बाद झाला. यात रणजीत सिंहजी यांच्या १०० धावांचा समावेश होता. फॉलॉऑन मिळाल्यावर त्याच दिवशी दुसऱ्या डावात रणजीत सिंहजी यांनी नाबाद १२५ धावा केल्या. रणजीत सिंहजी यांच्या खेळीने ससेक्सने २ बाद २६० धावा करत सामना वाचवला. वाचा- यासह एका सामन्यात दोन शतक करणारे ते ससेक्सचे तिसरे फलंदाज ठरले. पण या शिवाय प्रथम श्रेणी सामन्यात एकाच दिवशी दोन शतक करणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले. रणजीत सिंहजी यांच्यानंतर अशी कामगिरी कोणालाही करता आली नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मॅथ्यू एलियटने ३१ डिसेंबर १९९५ रोजी १०४ आणि १३५ धावा केल्या. पण पहिल्या डावात त्यांनी ९८ धावा केल्या होत्या. त्यानंतर स्पेनच्या तारिक अली अवान यांने ४ सप्टेंबर २०१२ रोजी युरोपियन चॅम्पियनशिप डिव्हिजन-२ या टी-२० लीगमध्ये दोन वेळा शतकी खेळी केली. त्याने एस्टोनिया विरुद्ध ६६ चेंडूत १५० तर पोर्तुगाल विरुद्ध १४८ धावा केल्या होत्या. वाचा- रणजीत सिंहजी यांनी १८९६ ते १९०२ या कळात इंग्लंड संघाकडून १५ सामने खेळले. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. त्यांनी भारतीय संघाकडून एकही सामना खेळला नाही. रणजीत सिंहजी यांचे करिअर- > इंग्लंडकडून खेळणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू होते > त्यांनी कसोटीत ४४.९५च्या सरासरीने ९८९ धावा केल्या. १७५ ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. > १९१५ साली शिकार करताना ते जखमी झाले आणि त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. > देशातील प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी त्यांच्या नावावर ठेवण्यात आली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FN0vMx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...